Crime_Arrest 
पुणे

पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील अवैध धंद्यांबरोबर सराईत गुन्हेगारांविरुद्ध पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (ता.२८) रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवित धडक कारवाई केली. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी 63 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचे जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त व प्रत्येक परिमंडळांचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व प्रत्येक पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त पथके स्थापन करून त्यांच्याद्वारे शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. वेगवेगळ्या पथकांनी दोन हजार 36 इतक्‍या गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये 705 गुन्हेगार पोलिसांना सापडले. पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईच्या 480 गुन्हे दाखल करून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाने बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक केली. त्याच्या ताब्यातुन एक गावठी पिस्तुल व दोन काडतूसे जप्त केली. याबरोबरच 23 गुन्ह्यांमध्ये 23 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातुन 22 कोयते व एक पालघन जप्त केले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे 4 तडीपार गुन्हेगारांना तडीपार आदेशाचा भंग करुन शहरात वास्तव केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 122 प्रमाणे संशयित फिरणाऱ्या 19 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. 

दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाने फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेश्‍याव्यवसाय सुरू असणाऱ्या ठिकाणांवरही छापे घातले. त्यामध्ये बुधवार पेठ येथील जुनी सागर, नवीन सागर, नवीन बिल्डींग या 3 इमारती मधील खोल्यांच्या तपासणी केली. त्यामध्ये एकुण 67 प्रौढ महिला मिळुन आल्या. सागर बिल्डींगमध्ये आढळलेल्या एका बांगलादेशी महिलेस ताब्यात घेऊन तिला रेस्क्‍यु होममध्ये ठेवण्यात आले.

कोरेगाव पार्क येथे मिस्टेक स्पा मसाज सेंटर या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाल्यानंतर तेथेही छापा घालण्यात आला. तेथून चार तरुणींना ताब्यात घेऊन वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त बच्चन सिंह यांच्या पथकाने कारवाई केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT