ramwadi.jpg 
पुणे

Video : पुणे : मजूर चालले होते पाय तुडवत गावी अन् पोलिसांनी पहा काय केले

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी (पुणे) : लॉक डाऊन काळात प्रशासनाकडून कुठलीही ठोस मदत मिळाल्यामुळे राज्यासह परप्रांतातील मजुरांनी आपल्या घराकडे जाण्याची वाट धरली आहे. असंख्य मजूर कुटुंबांसह शहरातील रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. राहण्याची सोय नाही. जवळ असलेले पैसेदेखील संपत असल्यामुळे आपल्या स्वतःच्या मूळ गावी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याच परिस्थितीत औरंगाबाद येथे शुक्रवारी सकाळी रेल्वे लाइनवर झोपलेल्या 16 मजुरांना मालगाडीने चिरडले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगर रस्त्याने पायी चालणाऱ्या मजुरांसाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेत ट्रॅव्हल बसची सुविधा शुक्रवारी संध्याकाळी उपलब्ध करून दिली.

नागपूर, नांदेड, यवतमाळपर्यंत 10 बसेसमधून सोशल डिस्टन्सचे पालन करत तीनशेहून अधिक मजुरांना कुटुंबीयांसह त्यांच्या मूळगावी पाठवण्याची व्यवस्था पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली. खांदवेनगर येथील वाघेश्वर पार्किंग या ठिकाणी खासगी बसेसमधून या मजुरांना रवाना करण्यात आले. शुक्रवारी दुपारपासून पुणे शहर व ग्रामीण पोलिसांच्या वेशीवरून असंख्य मजूर पायी चालले होते.

पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी या मजुरांना नागपूर, यवतमाळ, नांदेड या ठिकाणी जाण्यासाठी खासगी बसेसची व्यवस्था करून दिली. प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत त्यांना माफक दरात एका बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी अशी व्यवस्था करण्यात आली होती. ट्रॅव्हल्स कंपनीला देखील किमान पेट्रोल, डिझेल व टोल भाडे मिळेल एवढेच शुल्क आकारण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

आपल्या गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेली ही मदत पाहून गावी जाणारे मजूर भारावून गेले होते. संध्याकाळनंतर दहा बसेसमधून तीनशेहून अधिक मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रवाना करण्यात आले. प्रशासनाकडून परप्रांतीय व राज्याच्या इतर भागातील मजुरांसाठी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना न केल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच आपल्या स्वतःच्या गावी पोहोचण्यासाठी मजुरांनी मिळेल त्या दिशेने पायी गावाकडे जाण्याचा मार्ग निवडला आहे. 

राज्य व केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने आवश्‍यक ती उपाययोजना करण्याची विनंती पोलिस प्रशासनाने यावेळी केली आहे. पोलिस उपायुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विमाननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पवार, चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय तपासणी नियोजन करून मदत केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT