Pune police provided support to 9 lakh people during the curfew.jpg 
पुणे

#Lockdown2.0 : लॉकडाऊनमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 'एवढ्या' जणांच्या पोटाला दिला आधार

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोनाच्या परिस्थितीशी रस्त्यावर उभे राहून दोन हात करत असतानाच पोलिसांनी आपल्यातील सामाजिक जाणीव ही जागृत ठेवली. संचारबंदी सुरु झाल्यापासुन पुणे पोलिसांच्या "सोशल पोलिसींग सेल"च्यावतीने आत्तापर्यंत मजूर, बेघर, परप्रांतीय नागरिक अशा तब्बल नऊ लाख लोकांना जेवण पुरवुन त्यांना आधार दिला. त्याही पुढे जाऊन पोलिसांनी 54 हजार रेशन किट, 42 हजार मास्क व 35 हजार सैनीटायझर वाटप करीत पोलिसतील माणुसकीचे दर्शन घडविले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात 22 मार्चपासुन संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केल्याने लाखो परप्रांतीय मजूर शहरात अडकून पडले. त्याचबरोबर हातावर पोट असणाऱ्या लोकांचा रोजगार गेल्याने तेही रस्त्यावर आले. रेल्वे, बस व अन्य खासगी वाहने बंद असल्यामुळे बहुतांश नागरिक शहराच्या वेगवेगळ्या भागात मिळेल तिथे राहु लागले. पोलिसांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या मदतीने त्यांची निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था केली. मात्र त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी 163 सामाजिक व स्वयंसेवी संस्थाची मदत घेऊन या नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न सोडविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्या सुचनेनुसार "सोशल पोलिसींग सेल"ची निर्मिती केली. तर अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी पुढाकार घेत या सेलच्या माध्यमातून पोलिसांच्या सामाजिक कामाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. त्यानुसार, आतापर्यंत पोलिसांनी तब्बल नऊ लाख लोकांना जेवण पुरविले आहे. तसेच पुणे पोलिसांनी 54 हजार रेशन किट, 42 हजार मास्क व 35 हजार आणि सैनीटायझर वाटप केले आहे.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक
यांना पुरविले पोलिसांनी जेवण 
- मजुर, बेघर व गोरगरीब व्यक्ति -  8 लाख 35 हजार 117 
-  देहविक्रय करणाऱ्या महिला - 17 हजार 630 
- विद्यार्थी - 17 हजार 246 विद्यार्थी, 16 हजार 708
- रुग्ण व त्यांचे नातेवाईक - 16 हजार 708
- ट्रान्सजेंडर व्यक्ति - 1050
- आत्ता पर्यंत पुरविलेले जेवण - 8 लाख 87 हजार 751.
- अन्नदानासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या संस्था - 163

स्ट्रेस कमी करायचाय? घरबसल्या करा ऑनलाईन योग ध्यानसाधना

"पोलिस कोरोनापासून लोकांचे संरक्षण करण्यास प्राधान्य देत आहेत. कर्तव्य पार पाडतानाही आम्ही "सोशल पोलिसींग सेल" च्या माध्यमातून आपली सामाजिक बांधलकी जोपासत आहोत. पोलिस कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी सर्वजण यामध्ये कर्तव्य भावनेने काम करीत आहेत. त्यामुळेच आम्ही आत्ता पर्यंत 9 लाख लोकांना जेवण देऊ शकलो. त्यासाठी सामाजिक संस्थानी चांगली मदत केली आहे."
- डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT