BHR 
पुणे

BHR पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी संचालकांच्या घरी छापे; रात्री उशिरापर्यंत चौकशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ठेवीदारांची फसवणूक करीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेच्या संचालकांच्या घरी शुक्रवारी (ता.२७) छापे घातले. जळगाव आणि औरंगाबाद येथील संचालकांच्या घरी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे छापे घातले. रात्री उशिरापर्यंत संचालकांची चौकशी सुरू होती. 

पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांच्या ठेवी माघारी न मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या तीन पथकाकडून जळगाव आणि औरंगाबाद येथे छापे घातले. पुणे, पिंपरी आणि ग्रामीण पोलिसांकडे या घोटाळ्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. त्यादृष्टीने पतसंस्थेच्या अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील शिवाजीनगरमधील घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी छापा घातल्याने चांगलीच खळबळ उडाली.

पतसंस्थेच्या कार्यालयास शहरातील काही ठिकाणीही आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू केली आहे. याबरोबरच औरंगाबाद येथील संचालकांच्या घरीही पथकाने छापे घालून कारवाई केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, असे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT