Pune_Police
Pune_Police 
पुणे

मास्क न घालणाऱ्या बहाद्दरांनो, आता पोलिस तुम्हाला लस टोचणार पण दंडाची!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकीकडे पुण्यात कोरोनाची दहशत कायम आहे, तर दुसरीकडे मास्क हा नाका-तोंडावर लावण्याऐवजी तो नाकाखाली, मानेवर, गळ्यात किंवा खिशात मास्क ठेवून फिरणारे बहाद्दर रस्तोरस्ती फिरताना दिसत आहेत. अगदी पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, कलेक्‍टरपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी सांगितले, तरी त्यांना काही फरक पडेना, अखेर पोलिसांनीच दंडाची लस बाहेर काढीत ती प्रत्यक्षात 5 हजार 204 जणांना दिली आणि यापुढेही देणार आहेत. त्यामुळे आता न विसरता मास्क हा नाका-तोंडावर लावण्यासाठीच वापरा, अन्यथा तुम्हालाही दंडाची लस टोचल्याशिवाय राहणार नाही.

लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यापासून शहरातील बहुतांश सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होऊ लागले आहेत. शहराची घडी बसण्याच्या मार्गावर असतानाच दुसरीकडे मागील काही दिवसात शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची सद्यस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार, महापालिका, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना मास्कचा वापर करणे, एकमेकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यासाठी सातत्याने जागृती केली जात आहे. तरीही नागरिक मास्कचा वापर करण्याचे टाळत असल्याची सद्यस्थिती आहे. 

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिकेबरोबरच पोलिसही रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली दहा पोलिसांचे पथक त्यांच्या हद्दीमधील रस्ते, प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर नेमण्यात आले आहेत. संबंधीत अधिकारी आणि कर्मचारी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जात आहे.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी नागरिकांना मास्कचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरीक मास्क वापराबाबत गंभीर नाहीत. त्यामुळेच महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कारवाईमागे दंडवसूली हा उद्देश नाही, तर नागरिकांनी मास्क परिधान करुन स्वतःसह इतरांचेही संरक्षण करावे, हा हेतू आहे.''
- डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT