Hawkins_Cooker 
पुणे

पुण्यात ब्रँडेड कंपनीच्या नावानं कुकर विकणाऱ्यांचं भांडं फुटलं; १७ लाखांचा मालही जप्त

सकाळ डिजिटल टीम

पुणे : नामांकीत हॉकिन्स या कुकर कंपनीच्या नावाने बनावट कुकर तयार करण्यात येत होते. या कुकरची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने थेट कारवाई करीत तब्बल 17 लाख रुपये किंमतीचे बनावट कॉकीन्स कुकर जप्त केले.

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पॉलीकॅब कंपनीच्या नावाने बनावट विद्युत तारांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता बनावट कुकर विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप फुलचंद कोठारी (वय 56, रा. मंगळवार पेठ) व विनोद तखतमल जैन (वय 61, रा. शुक्रवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात कॉपी राईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉकिंन्स या नामांकित कंपनीचे बनावट कुकर तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाला कार्यवाही करण्याची सूचना दिल्या होत्या.

सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवार पेठेतील टी. एफ. कोठारी या दुकानात आणि फुरसुंगी परिसरातील गोडाऊनमधील श्री. शंखेश्वर युटेन्सिल्स अँड अप्लायन्सेस प्रा. ली. येथे एकाच वेळी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी प्रेशर कुकरचे 1 हजार 284 नग असा एकूण 17 लाख 45 हजार 955 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच नवीन माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 5 हजार लोगो आणि कागदी रॅपरही हस्तगत केले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

Waste Project Tender Issue : दक्षताच्या सूचना झुगारुन कचरा प्रकल्पाची निविदा; ठरावीक ठेकादारांना पायघड्या

Latest Marathi News Live Update : कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

SCROLL FOR NEXT