Pune-Policemen 
पुणे

पुणे : जोराचा वादळवारा सुटलाय, वरून पाऊस बरसतोय अन् ते पोलिस काका...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भर दुपारी अचानक ढग दाटून आले. बघता बघता आकाश काळवंडले आणि काही वेळातच वादळ-वाऱ्यासोबत जोरदार पाऊस बरसू लागला.

अशा वादळ, वारा अन् पावसात पोलिस नाईक विठ्ठल खिलारे यांनी पोलिसांसाठी उभा केलेला तंबू उडून जावू नये, यासाठी जमिनीवर पाय रोवून अक्षरशः शर्थीचे प्रयत्न करत होते. खिलारे यांची वादळ, वारा अन् पावसाशी सुरू असलेली झुंज पुणे पोलिस दलाला नवी ऊर्जा देऊन गेली.

एकीकडे कोरोना विरूद्ध पुणे पोलिस मागील दीड महिन्यापासून रस्त्यावरची लढाई लढत आहे. नागरिकांना कोरोना होऊ नये, यासाठी रात्रंदिवस उन्हातान्हात उभा आहे. अशातच 
शुक्रवारी (ता.१) पुण्यात पोलिसावर ऊन, वादळ आणि तितक्याच जोरदार पावसाबरोबर दोन हात करण्याची वेळ आली. पण कोरोना विरूद्ध लढणारे पुणे पोलिस याही परिस्थितीमध्ये डगमगले नाहीत. याउलट वादळ वाऱ्यात, पावसात पाय रोवून पुणेकरांचे संरक्षण करण्यासाठी तत्पर होते.

शहरातील प्रत्येक नाकाबंदी ठिकाणावर पोलिस अधिकारी व कर्मचारी भर पावसातही आपली ड्युटी करत होते. त्यांच्याप्रमाणेच विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलिस नाईक असलेले विठ्ठल खिलारे हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी दुपारी शनिपार चौकात नाकाबंदी ठिकाणावर आपली ड्युटी करत होते. त्याचवेळी आकाशात अचानक ढग दाटून आले.

बघता बघता आकाश काळवंडले आणि काही वेळातच अंगावर शहारा आणणारा वादळ, वारा सुरू झाला. त्याच बरोबर जोरदार पाऊस बरसू लागला. अशा वादळ, वारा अन् पावसात पोलिस नाईक खिलारे ड्युटी करत होते. त्याचवेळी पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी काही सामाजिक संस्थांनी उभारलेले तंबू वादळवाऱ्याने उडू लागले.

खिलारे यांनी तंबू उडू लागल्याचे पाहून भर वादळवाऱ्यात, पावसात उडून जाणारा तंबू वाचविण्यासाठी प्रयत्न केला. केवळ आपल्याला मदत करणाऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक नुकसान नको, या भावनेपोटी खिलारे यांनी तंबू वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी एका व्यक्तीने त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. लाखो लोकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चूडाप्पा यांनीही खिलारे यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT