porsche motors pune accident esakal
पुणे

Pune Porsche Accident: जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय! बाल हक्क मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Pune Porsche Accident: पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानं अल्पवयीन आरोपीला आज पुण्यातील बाल हक्क मंडळात हजर करण्यात आलं.

सनिल गाडेकर

भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची पाच जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने बुधवारी (ता. २२) हा आदेश दिला.

मंडळाच्या प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे आणि के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर ही सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. बुधवारी आठच्या सुमारास निकाल देत मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

आरोपीला देण्यात आलेल्या जामिनाचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. मात्र सत्र न्यायालयाने पोलिसांना बाल न्याय मंडळात अर्ज करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी मंडळात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी (ता. २२) सुनावणी झाली.

कल्याणीनगरमधे झालेल्या अपघातानंतर आरोपीविषयी समाजात रोष आहे. त्यातून त्याला इजा पोचेल अशा घटना होवू शकता. त्यामुळे त्याने बाहेर राहणे धोकादायक ठरू शकते, असे म्हणणे पोलिसांनी सादर केले. जामीन झाल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यासाठी काही बदल गरजेचे आहेत. त्यामुळे आता त्याला सुधारगृहात पाठवणे कायदेशीर नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी केला. लेखी आदेश मिळाल्यानंतर याबाबत अपील करण्यात येणार असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले.

मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर सुनावणी नाही

मुलाला प्रौढ घोषित करावे, अशी मागणी या प्रकरणात पोलिसांनी केली होती. मात्र त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन दिवसांत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. दोन महिने त्याच्या मानसिक, शारीरिक स्थितीविषयी अनेक अहवाल येतात. त्या काळात त्याला सुधारगृहात ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी ६० ते ९० दिवसांची प्रक्रीया आहे. त्यानंतर मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत निर्णय होतो, असे ॲड. पाटील यांनी सांगितले.

पोलिस थेट सुधारगृहात येवू शकत नाही

या प्रकरणाचा तपास करताना पोलिस थेट सुधारगृहात येवू शकत नाही. त्यांना जर मुलाकडे चौकशी करायची असेल तर त्यांनी मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मुलाने मद्यपान केले की नाही याबाबतचा अहवाल लिफाफा बंद पद्धतीने न्यायालयात दोषारोपपत्रासह सादर केला जार्इल, असे ॲड. पाटील यांनी मंडळात नमूद केले.

निबंध लिहिण्यासह विविध अटींवर झाला होता जामीन

बेदरकारपणे मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुलाला मंडळाने येरवडा वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्याचा आदेश दिला होता. वाहतूक जागृतीबाबतचे फलक रंगवावे. अपघातावर त्याने ३०० शब्दांचा निबंध लिहावा. दारूचे व्यसन सोडण्यास मदत होईल, अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन घेत त्याचा अहवाल न्यायालयात दाखल करावा, या अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला होता.

पोर्शे गाडीच्या कॅमेऱ्यातील अपघाताचा व्हिडीओ तपासणार

कल्याणीनगरमधील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या मोटारीमधील कॅमेऱ्याने टिपलेले अपघाताचे चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत होणार आहे.

कल्याणीनगर येथे रविवारी (ता. १९) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव आलिशान मोटारीने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन्ही पब, घटनास्थळ आणि येरवडा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने मद्य सेवन केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आता पोलिस त्या आलिशान मोटारीतील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहेत. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT