ransom
ransom sakal
पुणे

नामवंत उद्योगपतीकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) व प्राप्तीकर विभागाच्या कारवाई करण्याची धमकी देऊन नामवंत उद्योगपतीकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून बीएमडब्ल्यू कार, मोबाईल असा साठ लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

संतोष कपुरचंद राठोड (वय 48, रा. शाहु चौक, शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापुर्वी रुपेश ज्ञानोबा चौधरी (वय 43, रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामवंत उद्योगपतीला बांधकाम व्यावसायिक रुपेश चौधरी, ईस्टेट एजंट संतोष राठोड व अन्य आरोपींनी 22 सप्टेंबर रोजी शनिवार पेठेतील कार्यालयात बोलावून घेतले होते.

उद्योगपतीच्या एका कंपनीने डिएचएफएलकडून घेतलेल्या 68 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यामध्ये ईडी व एसएफआयओ यांनी त्रुटी काढल्या आहेत, असे चित्र आरोपींनी तयार केले होतेत तसेच संबंधीत प्रकरण मिटवून देतो, असे सांगून त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला सोडणार नाही, बघून घेऊ, अशी धमकी दिली होती.या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर रुपेश चौधरी यास अटक करण्यात आली होती.

चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. त्यावेळी संतोष राठोड हा त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी घोरपडे पेठेत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून राठोड यास अटक केली.

आरोपींनी गुन्ह्याच्यावेळी वापरलेली बीएमडब्ल्यू कार व मोबाईल असा साठ लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, सतीश भालेकर, विजयसिंग वसावे, अशोक माने, शशिकांत दरेकर, अमोल पवार यांच्या पथकाने हि कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT