दानवे 
पुणे

बालवडकरांना सरांजामाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी : दानवे

गरीब नागरिकांना खास दिवाळी निमित्ताने सरंजाम वाटप करण्यात आले या प्रसंगी दानवे बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे प्र. क्र.9 मधील गरीब नागरिकांना खास दिवाळी निमित्ताने सरंजाम वाटप करण्यात आले या प्रसंगी दानवे बोलत होते. बालवडकर यांच्या कार्यक्रमाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी "पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी" अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना "दिवाळी सरंजाम ही केवळ नागरिकांची दिवाळी चांगली जावी म्हणून एक भेट आहे. त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जर केले असेल, त्यांची कामे केली असेल तर निश्चितच नागरिकांचे आशीर्वाद मला मिळतील" अशी भावना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये नागरिकांना आर्थिक दुरवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम अमोल बालवडकर करत आहे.

परभणी आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या "परभणी जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांची काळजी अमोल बालवडकर नेहमीच घेत आले आहेत व इथून पुढेही अशीच घेत राहणार", परभणीचे भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी देखील बालवडकरांच्या कामांचे कौतुक केले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिशजी मुळीक, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण दगडे पाटील, प्रकाशतात्या बालवडकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, ज्ञानेश्वर तापकीर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, उमाताई गाडगिळ,अस्मिता करंदिकर, प्रल्हाद सायकर,सुंदर बालवडकर उपस्थित होते.

प्रल्हाद सायकर यांच्या संकल्पनेतून, स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत बाणेर येथे उभारले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास २,५१,०००/- ची रोख देणगी अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे देण्यात आली , प्रभागातील दिव्यांग गरजु नागरीकाला तीन चाकी सायकल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते भेट दिली. या कार्यक्रमा दरम्यान अनेक गरजुंना सरंजाम वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT