कोरोना  sakal media
पुणे

पुणेकरांच्या चिंतेत भर; 24 तासात 5,571 कोरोना बाधितांची नोंद

सक्रिय रुग्णांपैकी केवळ 4.33 क्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

निनाद कुलकर्णी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह शहरातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, आज पुणे शहरात (Pune Covid Updates In Marathi) गेल्या 24 तासात 5 हजार 571 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून, सक्रिय रुग्णांपैकी केवळ 4.33 क्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. (Pune Records 5,571 New Covid Cases )

सध्या शहरात 19 जण व्हेंटिलेटरवर (Ventilator) तर, 182 जण ऑक्सिजन सपोर्टवर (Oxygen Support ) रूग्णालयात दाखल आहे. आज पुणे महापालिका हद्दीमध्ये 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर हद्दीबाहेरील 3 जणांच्या मृत्यूची (Corona Death In Pune) नोंद आज करण्यात आली आहे. आज 2,335 रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुण्यामध्ये 25, 737 सक्रिय रुग्ण आहेत. (Active Corona Cases In Pune)

Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल

रुग्णालयाच्या आयसीयू (Corona Patient In ICU ) विभागामध्ये दाखल झालेल्या आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) केलले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग किती धोकादायक आहे हे तपासण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (Health Ministry Changed Strategy Of Genome Sequencing Omicron)

सुरुवातीला सामान्य लोकसंख्येच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing Omicron) हे ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी केले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढू लागले असून, मृत्यू देखील वाढले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगची नवीन रणनीती तीन दिवसांपासून कार्यरत असून, एका आठवड्याच्या आत, ओमिक्रॉनशी (Omicron) संबंधित प्रारंभिक डेटा ठोस स्वरूपात प्राप्त होईल असे सांगितले जात आहे. गेल्या 24 तासांत देशभरात ओमिक्रॉनच्या 620 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या 5,488 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या एकूण बाधितांपैकी 2,162 रुग्ण बरे झाले आहेत. (Omicron Cases In India)

लसीकरणाबाबत भ्रम पसरवणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा; मोदींचं आवाहन

देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांचं लसीकरण झालेलं असतानाही त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर काहीजण लसीकरणाबाबत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे प्रयत्न हाणून पाडा, असं आवाहन पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत केलं. देशातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. (Thwart attempts to spread illusions about vaccination PM Modi appeal to all CM)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT