पुणे

Pune Success Story: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कासेवाडीचा ओम गरूड पोहचला अमेरिकेत!

Latest Marathi News: ओमचे आई, आजी आणि एक बहिण असे त्रिकोणी त्याचे कुटुंब आहे.

मोहिनी मोहिते

Latest Pune News : गर्दी, गोंगाट, पावसाळ्यात घरात उभा राहायला जागा नाही, उन्हाळ्यात उकाड्याने हैराण, अभ्यासासाठी पुरेशी साधनं नाहीत, याकडे दुर्लक्ष करून जिद्द, चिकाटी, कष्ट करीत यशस्वी होण्याची किमया भवानी पेठ (काशेवाडी) येथील ओम नितीन गायकवाड या तरुणाने केली.

त्याला पुढील शिक्षणासाठीअमेरिकेने बोलावून घेतले, हा क्षण त्याच्याच नव्हे तर तमाम काशेवाडीकरांच्या अभिमानाचा क्षण आहे. संकटाकडे पाठ फिरविण्यापेक्षा त्यावर मात करण्याची तयारी ठेवली, तर यश तुमच्या पायाशी लोळण घेत येते, असे शालेय जीवनामध्ये ऐकलेले शब्द ओम ने खरे करून दाखविले आहेत.

काशेवाडीसारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये पायवाटसुद्धा नाही, उघड्यावर सांडपाणी वाहते, दररोज कोणाचे तरी भांडणतंटा, आरडाओरडा गोंधळ, पाणी, वीज नाही, वारंवार तुंबलेल्या गटाची दुर्गंधी अशा काशिवाडी झोपडपट्टीत ओमचा जन्म झाला. बाल वयात वडिलांचे छत्र हरपले. आई, आजी आणि एक बहिण असे त्रिकोणी त्याचे कुटुंब आहे.

त्याची आई ओम शिकत असलेल्या शाळेत मदतनीस म्हणून कामाला लागली. ओमने शालेय ही जीवनात चुणूक दाखविली, शिक्षकांनाही अभ्यास करणारी मुले प्यारी असतात, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. अभ्यासामध्ये सातत्य ठेवून सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे स्वप्न त्याने मनी बाळगले होते. जिद्द, चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला. रामोशी गेट येथील श्रीमती सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम संलग्न आकांक्षा फाउंडेशन या शाळेत इयत्ता दहावीत 89 टक्क्यांनी तो उत्तीर्ण झाला.

यावेळी ओमचा खडतर प्रवास तर सुरू होता. शाळेच्या माध्यमातून युडब्ल्यूसी महिंद्राच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. यूडब्ल्युसीने त्याला विकसित व्यक्ती होण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे महाविद्यालयातील दोन वर्षे आयुष्य बदलणारी आणि अत्यंत परिवर्तनकारी ठरली. यावेळी त्याने आयबी डिप्लोमासह एक अधिक बौद्धिक, जिज्ञासू आणि धाडसी व्यक्ती म्हणून भरघोस गुणांसह पदवी प्राप्त केली आहे. सध्या तेथे तो विद्यार्थी इंटर्न म्हणून काम करत आहे.

ओम येत्या २६ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील सेंट ओलाफ कॉलेजमधून लिबरल आर्ट्समध्ये बॅचलर करण्यासाठी धाव घेत आहे. त्याला कॉलेजच्या माध्यमातून दरवर्षी ६४ लाखांची पुढील चार वर्षाची डेविस स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

मात्र पुढील विविध खर्चाकरिता त्याने आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. परदेशी शिक्षणासाठी कासेवाडी भागातून पहिल्यादांच एक झोपडपट्टीतील मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार असल्याने सर्व भागात त्याचे कौतुक केले जात आहे. ओमचा आदर्श प्रत्येक पाल्यांनी घ्यावा अशी ही चर्चा परिसरात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील निकाल काही क्षणांत.. कोर्टात काय घडतंय? वाचा सर्व अपडेट्स

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT