shugarcane 
पुणे

कोरोनाच्या लढाईत साखर कारखान्यांनी अशी पुरवली रसद 

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे) : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनतेला आवश्यक असलेले सॅनिटायझर उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील सुमारे ऐंशी साखर कारखान्यांनी अल्पावधीत सॅनिटायझरनिर्मिती करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

बहुतांश कारखान्यांकडे सॅनिटायझरची सर्वदूर वितरण व्यवस्था उपलब्ध नव्हती, मात्र तरीही आपापल्या जिल्ह्यात कारखान्यांनी मुबलक सॅनिटायझर पुरविले. तसेच, कारखान्यांच्या स्वस्तातल्या सॅनिटायझरनिर्मितीमुळे भांडवलदार कंपन्यांच्या नफेखोरीलाही आळा बसला आहे.

कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी मार्चमध्येच हात स्वच्छ धुण्याची मोहिम सर्वदूर पसरली. बाजारपेठेतील अनेक प्रस्थापित कंपन्या पाचशे रूपये प्रतिलिटरच्या आसपास सॅनिटायझर विक्री करत होत्या. त्यातही सॅनिटायझर पुरेसे उपलब्ध नसल्याने 'ब्लॅक' विक्रीमध्ये दीडशे- दोनशे रूपयांना शंभर मि.लि.ची बाटली, असा दर भडकला होता. बोगस सॅनिटायझरचीही विक्री होत होती. कंपन्या आणि विक्रेते असा हात धुवून घेत होते. 

याचवेळी सरकारच्या परवानगीनुसार सुरवातीला स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समर्थ कारखान्याने अल्कोहोलपासून सॅनिटायझरनिर्मिती करण्यात पुढाकार घेतला. त्यापाठोपाठ राज्यात हंगाम घेणाऱ्या 144 पैकी तब्बल ऐंशी कारखान्यांनी दर्जेदार प्रतिच्या सॅनिटायझरनिर्मितीस हातभार लावला. अन्न व औषध प्रशासनाकडून त्वरीत परवानग्या मिळाल्या. प्रतिलिटर पाचशे रूपये दर आकारण्यास परवानगी असातनाही कारखान्यांनी आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात अवघ्या शंभर ते सव्वाशे रूपये लिटर दराने सॅनिटायझरची विक्री केली. यामुळे कंपन्या आणि विक्रेतेही जमीनीवर आले. 

परवानगी आणखी वाढवावी
कारखान्यांकडे सॅनिटायझरची सर्वदूर विक्री व वितरण करेल, अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे राज्यभर व राज्याबाहेर पोचता आले नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. कारखान्यांसाठी चारशे कोटींच्या वार्षिक उलाढालीत पन्नास-साठ लाखांचा सॅनिटायझरचा व्यवहार फार मोठा नाही किंवा नफाही दहा टक्क्यांच्या आसपासच आहे. साखरविक्री ठप्प असल्याने झालेल्या आर्थिक कोंडीत सॅनिटायझरने कारखान्यांना आधार नव्हे, पण दिलासा मात्र दिला आहे. दरम्यान, सरकारने सॅनिटायझरनिर्मितीसाठी तीन महिन्यांसाठीच परवानगी दिली आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे.

सरकारच्या आवाहनानुसार सॅनिटायझरनिर्मितीस कारखान्यांनी सुरवात केली. आतापर्यंत ऐंशी कारखान्यांनी 32 लाख लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. अवघ्या शंभर ते सव्वाशे रूपये लिटर, अशा नाममात्र दराने केले. बाजारपेठेच्या तुलनेत ते अत्यंत स्वस्त होते. कारखान्यांना चार पैसे मिळालेदेखील. व्यवसाय म्हणून त्याकडे पाहताही येईल. तूर्तास विषाणू संपविण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर उपयुक्त आहे. परंतु कोरोनानंतरच्या काळातही खप होईल याबदद्ल शंका आहे.
 - राजेंद्र यादव,
कार्यकारी संचालक, सोमेश्वर साखर कारखाना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT