Prafulla Dhariwal Ghibli Studio maker Pune Tech scientist esakal
पुणे

Ghibli चा नाद जगभर पसरला, पण सुरुवात कुठून झाली माहितीये? पुण्याच्या एका पठ्ठ्यापासून! Chatgpt वर..

Prafulla Dhariwal Ghibli Studio Creator : जगभरात सध्या एक नवीन डिजिटल ट्रेंड धुमाकूळ घालतोय 'Ghibli स्टुडिओ'. सोशल मिडियावर पाहायला मिळणाऱ्या सुंदर अॅनिमेटेड फोटो-व्हिडीओजच्या मागे आहे एक भारतीय आणि तोही आपल्या पुण्याचा.

Saisimran Ghashi

Ghibli Studio maker Pune Tech scientist : जगप्रसिद्ध ओपनएआय कंपनीच्या ‘चॅट जीपीटी’ने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट इमेज जनरेटर सेवा लाँच केली ‘घिबली स्टुडिओ’. हा फिचर वापरून युजर्स आपल्या फोटो आणि व्हिडीओला स्टुडिओ घिबलीसारख्या क्लासिक अॅनिमेशन शैलीत रूपांतरित करू शकतात. आणि अवघ्या काही आठवड्यांतच या फिचरला अफाट लोकप्रियता मिळाली. दोन आठवड्यांत १३ कोटींहून अधिक लोकांनी ७०० कोटींहून अधिक अॅनिमेटेड फोटो तयार केले. पण या यशामागे कोण आहे, हे जाणून घेणं खरंच रोचक ठरतं.

या फिचरमागचा मेंदू म्हणजे प्रफुल्ल धारीवाल (Prafulla Dhariwal Ghibli) मूळचा पुण्याचा आणि सध्या ओपनएआयमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेला एक अत्यंत हुशार भारतीय. प्रफुल्लने ‘घिबली स्टुडिओ’च्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण प्रवासात नेतृत्वाची भूमिका पार पाडली. त्याच्या छोट्या टीमने जवळपास वर्षभर हे फिचर विकसित केलं आणि जेव्हा ते लाँच केलं, तेव्हा जगभरातून मिळालेल्या प्रतिसादाने सर्वांनाच थक्क केलं.

एका व्हिडीओमध्ये प्रफुल्लने सांगितले, “आम्हाला माहित होतं की आम्ही काहीतरी अर्थपूर्ण आणि वेगळं तयार करत आहोत. पण जेव्हा लाँच केलं, तेव्हा ज्या प्रमाणात लोकांनी याचा वापर केला आणि आवड दर्शवली, ते खरोखरच अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक होतं.” विशेष म्हणजे, भारत हा ‘घिबली स्टुडिओ’साठी जगात सर्वांत वेगाने वाढणारे मार्केट ठरले आहे.

प्रफुल्ल धारीवाल हे नाव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन नाही. त्यांनी याआधीही ओपनएआयच्या ‘GPT-4o’ या शक्तिशाली मॉडेलच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. त्यांचा शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. आयआयटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपलं करिअर संशोधनात घडवलं आणि थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात नवा ठसा उमठवला.

आज प्रफुल्ल धारीवाल हे नाव केवळ पुण्याचं नाही, तर संपूर्ण भारताचं अभिमानाचं प्रतीक बनलं आहे. एक असा तरुण ज्याने आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाला ‘घिबली’च्या स्वप्नमय दुनियेत नेलं… आणि हे करताना आपली भारतीय ओळखही जपली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0: जीएसटी कमी झाला पण नागरिकांना फायदा होत नाही; सरकारकडे आल्या 3,000 तक्रारी

"टीव्हीने तेव्हा इंडस्ट्री तारली..." तेजश्रीने घेतली मालिकाविश्वाची बाजू; "आम्ही दिवसाला 15-20 सीन.."

Kalandi Earthquake : भूकंपाचे धक्के अन् तहसीलदारांचे ग्रामस्थांसोबत जागरण! कलांडीत भूगर्भातून मोठा आवाज अन्...; 'त्या' रात्री काय घडलं?

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोण? देशात ३५वी रँक मिळवत UPSCमध्ये यश

Navmi Havan 2025: नवमीला हवन करणे का गरजेचं आहे? जाणून घ्या सामग्री, विधी, मंत्र अन् मुहूर्त एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT