Sawai Gandharva Festival  
पुणे

पुणे : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द! आयोजकांची माहिती

२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार होता सोहळा

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या यापार्श्वभूमीवर २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणारा ६८वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (Shrivivas Joshi) यांनी दिली आहे. (Pune this year Sawai Gandharva Bhimsen Festival canceled)

यावर स्पष्टीकरण देताना जोशी म्हणाले, राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत आहेत. यामुळं निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे.

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही जोशी यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi Decision: सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका एकत्र लढविणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; नेमकं बैठकीत काय घडलं?

CAT 2025 Exam: CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबरला; निकाल जानेवारी 2026 मध्ये जाहीर होणार

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

Rahimatpur Politics: 'प्रभाकर देशमुख, सुनील माने घड्याळाच्या प्रेमात'; पाटील बंधूंकडून बेरजेचे राजकारण, राष्ट्रवादीच्या गळाला दोन नेते लागले?

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ओट्स पराठा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT