Sakal News 
पुणे

Pune Traffic: राजभवनजवळ कंटेनर पलटला; बाणेर, औंध रोडवर सकाळीच वाहतूक कोंडी

याचा परिणाम म्हणून बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे विद्यापीठी चौकाजवळ राजभवन इथं एक कंटनेर पलटी झाला आहे. याचा परिणाम म्हणून बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली. याभागात सकाळी ऑफिससाठी बाहेर पडलेले लोक आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. (pune traffice container overturned at pune university chowk morning traffic jam on baner and aundh road)

दरम्यान, सांगवीकडून विद्यापीठाकडं येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे. कंटेनर उलटल्यामुळं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT