अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा  sakal
पुणे

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा : नकुल बुट्टा, चंद्रभागा कचरे प्रथम

देशातील तेवीस राज्यातील १३२० स्पर्धकांचा सहभाग

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने दुर्गम अशा सिहंगड, राजगड, आणि तोरणा या तीन किल्ल्यावरील अतिशय थरारक अल्टा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शनिवार (ता.११) रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्वात मोठ्या ५३ किलोमीटर स्पर्धेत उत्तराखंडच्या नकुल बुट्टा,आणि महाराष्ट्रची चंद्रभागा कचरे यांनी पुरुष आणि महिला गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत तेवीस राज्यातील १३२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. सिहंगड ते राजगड, आणि तोरणा या तीन किल्ल्यावरील ५३ किलोमीटर शर्यतीचा मार्ग होता. या शर्यतीत पुरुष गटातून उत्तराखंडच्या नकुलने ७ तास ५ मिनिटे व ३२ सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला तर महिला गटातून महाराष्ट्रची चंद्रभागा कचरे यांनी ९ तास २५ मिनिटे ५ सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला.

अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे उद्घाटन महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रविंद्र सिंघल आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या हस्ते करण्यात आले .

२५ कि .मि. स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर ,पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर , वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

११ कि .मि .स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शांताराम इंगवले, नवनाथ पारगे , डाॅ नंदकुमार मते, वेल्हेच्या माजी सभापती निर्मला जागडे यांचे हस्ते करण्यात आले.

स्पर्धा अंतर ,विजेत्यांची नावे ,व त्यांना लागलेला वेळ खालीलप्रमाणे

११ कि .मी. पुरूष

  • प्रथम क्रमांक - साहील नाय्यर-१.१५.२३

  • द्वितीय क्रमांक -सचिन घोगरे -१.१९.११

  • तृतीय क्रमांक-आकाश लक्शरी-१.२१.५२

महिला

  • प्रथम क्रमांक-मीना जगनाडे- १:४३.५८

  • द्वितीय क्रमांक -नेहा तिकम- १.४९.०८

  • तृतीय क्रमांक-सुकन्या बांदल- १:५२:३३

२५ कि मि पुरूष

  • प्रथम क्रमांक - अंकीत गीरी-२:३०:३७

  • द्वितीय क्रमांक -विकास-२:३८:४५

  • तृतीय क्रमांक-संकेत गणेशवाडे-२:४१:४७

महिला

  • प्रथम क्रमांक -क्लेअर जन्सन-३:२४:११

  • द्वितीय क्रमांक- पुजा सुर्यवंशी-३:४२:०७

  • तृतीय क्रमांक-डाॅ आरती झवर-३:४८:३८

५३ कि. मी .पुरूष

  • प्रथम क्रमांक-नकुल बुट्टा-७:५:३२

  • द्वितीय क्रमांक-वैभव रामतिर्थे-७:१७:५६

  • तृतीय क्रमांक-व्ही आर प्रथाप- ७.१९.४२

महिला

  • प्रथम क्रमांक-चंद्रभागा कचरे-९.२५.०५

  • द्वितीय क्रमांक-शिल्पा फडके-९.४९.०३

  • तृतीय क्रमांक-सुशिला कचरे-१०.०५.२४

वेल्हे येथील तोरणा विद्यालयाच्या मैदानावर अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन

५३ कि. मी. स्पर्धेतील बक्षिस वितरण समारंभ वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी वेल्हेचे सरपंच संदिप नगिने, मेंगाई देवस्थानचे उपाध्यक्ष प्रमोद पवार, माजी सरपंच संतोष मोरे आदी उपस्थित होते. वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशचे दिग्विजय जेधे,अनिल पवार, मारूती गोळे,महेश मालुसरे ,मंदार मते,हर्षद राव,राजेश सातपुते अमर धुमाळ ,हरिष गवई,सुजीत ताकवणे.आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे हे ४थे वर्ष आहे.

अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रविंद्र सिंघल व वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी सहभाग घेतला .तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी यांचे या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण करण्याचे दुसरे वर्ष आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT