Pune_University 
पुणे

ऑनलाईन परीक्षा होणार पण कॉलेजमध्ये? पुणे विद्यापीठात हालचालींना वेग

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या की आऑनलाइन याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण या परीक्षा ऑनलाइन झाल्यास विद्यार्थ्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर न घेता त्या महाविद्यालयस्तरावर परीक्षकांच्या नियंत्रणात व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतल्यास ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारांना चाप बसणार आहे.

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची व बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटरवर घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेकांनी एकत्र बसून पेपर सोडविले. गुगलवरून उत्तरे शोधून परीक्षा दिली. यामुळे या परीक्षांचा निकाल सुमारे ३० टक्क्यांनी वाढला आहे. बॅकलॉगच्या परीक्षेत प्रॉक्टर्ड मेथडचा उपयोग केल्याने आॅनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी कमी होऊन गोंधळ टळला. पण त्यातही कॉपीचे प्रकार घडले आहेत.

विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी देखील आॅनलाइन परीक्षेची मागणी केली आहे, पण यावेळी आॅलाइन परीक्षेत सुधारणा व्हावी असाही एक मतप्रवाह आहे. १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, ‘‘प्रथम सत्राच्या परीक्षा आॅनलाइन झाल्यातर त्यात गुणवत्ता राखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आॅनलाइन परीक्षा महाविद्यालयांमध्ये परीक्षकांच्या नियंत्रणाखाली व प्रॉक्टर्ड मेथडने झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केला जाईल.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT