Pune_University 
पुणे

अंतिम वर्षाच्या परीक्षेत अडथळेच अडथळे; विद्यापीठाने तारखांमध्ये केला बदल

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, याच दरम्यान नेट, 'यूपीएससी' आदी परीक्षांच्या आलेल्या तारखा, प्रश्‍नसंचाचे काम अर्धवट असणे आणि ऑनलाइन परीक्षेसाठी संस्था निश्‍चित न झाल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यास अडथळे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाने 1 ते 9 ऑक्‍टोबर बॅकलॉगची परीक्षा तर 10 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान मुख्य परीक्षा घेतली जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. तेव्हापासून विद्यार्थी वेळापत्रक कधी जाहीर होणार याची विचारणा विद्यापीठाकडे करत आहेत. विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉईस क्वेश्‍चन- एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी तयारी सुरू केली.

विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे 3 हजार 300 विषय आहेत. त्यासाठी प्रश्‍न पत्रिका तयार करण्याचे काम गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. 23 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रश्‍नपत्रिका तयार होणे अपेक्षित होते, पण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रश्‍नपत्रिका तयार करणे, त्यांची उत्तरे देणे हे काम करणे अनेक प्राध्यापकांना अवघड जात आहे, त्यासाठीचे तांत्रिक प्रशिक्षण नसल्याने या कामास विलंब होत आहे. विशेषतः कला शाखेच्या प्राध्यापकांना या अडचणी येत असल्याने आत्तापर्यंत सुमारे 75 टक्के विषयांचे काम पूर्ण झाले आहे.

ऑक्‍टोबर महिन्यात 1, 5 आणि 9 या दिवशी नेटची परीक्षा आहे, तर 4 ऑक्‍टोबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा आहे. तर 11 ऑक्‍टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा आहे. यासाठी पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षासाठीचे अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. या दिवशी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे टाळले आहे.

सोमवारी निविदा उघडणार
ऑनलाइन परीक्षेसाठी खासगी एजन्सी निवडण्यासाठी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्याची मुदत रविवारी मध्यरात्री 12 वाजता संपणार असून, निविदा सोमवारी उघडल्या जाणार आहे. त्यानंतरची कागदपत्रांची छाननी, नियम अटींची पूर्तता ही सर्व प्रक्रिया पार पडण्यास किमान एका आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच परीक्षेसाठीचे सॉफ्टवेअर उपलब्ध होणार असल्याने पहिल्या आठवड्यात परीक्षा घेता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT