पुणे

पुणे कोणाची जहागिरी नाही - असदुद्दीन ओवेसी

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""खासदार असूनही तीन वर्षे मला पुण्यात येण्यापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजपने रोखले. वेगवेगळी कारणे दाखवत नोटीस बजावता, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांनाही नोटीस द्या. पुणे काही कोणाची जहागिरी नाही,'' असा संताप व्यक्त करत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलीमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी "मी पुण्याचाच आहे आणि पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील,' असा विश्‍वास व्यक्त केला. 

"एमआयएम'च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ओवेसी यांची भवानी पेठेत प्रचार सभा झाली. या वेळी आमदार इम्तियाज जलील, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महासचिव मिलिंद अहिरे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, "एमआयएम'चे राज्य समिती सदस्य अंजुम इनामदार, शहराध्यक्ष व उमेदवार जुबेर शेख व सर्व उमेदवार उपस्थित होते. 

पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. त्यावर ओवेसी म्हणाले, ""इतरांच्या सभा होतात, त्यांना नोटीस दिली जात नाही, मग मलाच का? घटनेने मलाही बोलण्याचा अधिकार दिला आहे. मला रोखणारे तुम्ही कोण? मी प्रक्षोभक भाषण करतो आणि धर्मा-धर्मात तेढ निर्माण होते, अशी कारणे पोलिस देत आहेत. मी मृत्यूला घाबरत नाही, मात्र मला मारणारे तेच असतील, ज्यांनी महात्मा गांधी व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना मारले आहे. मी धर्मांध नसून लोकशाहीला मानणारा आहे.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पवार, ठाकरेंवर ओवेसी यांनी टीका करत पुण्यातील प्रश्‍नांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ""मोदींनी पुण्याची मेट्रो गायब केली; तर राष्ट्रवादीने सत्तेत असताना हज हाउस केले नाही. 55 टक्के नागरिक झोपड्यांमध्ये राहत आहेत, तर कर्बस्तानच्या जागेवर "एसआरए' उभारल्या जात आहेत. धरणातील पाण्याबाबतचे अजित पवारांचे विधान सर्वांना माहीत आहे. भाजपला गरज पडेल तेव्हा पाठिंबा देण्याची भाषा बोलणाऱ्या पवारांना आत्ताच धर्मनिरपेक्षता कशी आठवली. शहराचा विकास करून पुणे गुंडांपासून व भ्रष्टाचारमुक्त करू.'' 

मी एकटाच गर्दीतून जाईल! 
पोलिसांच्या नोटिशीमध्ये ओवेसी यांच्या जीवितास धोका असल्याचे कारण दिले होते. त्याला ओवेसी यांनी आव्हान दिले. "मला कुणाचीही भीती नाही, सभा संपल्यावर याच गर्दीतून मी जाईल', असे ओवेसी यांनी सांगितले होते. सभेनंतर त्यांनी गर्दीमध्ये जात तरुणांशी हस्तांदोलन करत गेले. त्यामुळे उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT