suicide sakal
पुणे

पुणे : पत्नी-सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

हडपसरच्या सातववाडी येथील घटना : आत्महत्या करण्यापूर्वीची सुसाईट नोट लिहून ठेवली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

योगेश रुपचंद धनवडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. योगेश यांच्या पत्नी आणि सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा रुपचंद धनवडे (वय ६५, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, योगेश धनवडे हा सध्या बेरोजगार होता. त्यावरुन पत्नी व सासरे हे त्याला बोलत असत. त्यांच्यात नेहमी भांडणे होत. दोघांच्या त्रासाला कंटाळून योगेश याने सातववाडी येथील घरात १० नोव्हेबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने पत्नी व सासरे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्याची ही चिठ्ठी नुकतीच सापडली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT