Electric_Bike 
पुणे

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ई-बाईक सेवा देणारं पहिलं शहर ठरणार!

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : पुणे शहरात वाढते प्रदूषण कमी व्हावे, यासाठी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून विट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता मिळाली असून, अंतिम मंजुरीनंतर तीन महिन्यानंतर हा प्रकल्प पुणेकरांसाठी तयार असणार आहे.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेले वाहनांचे प्रमाण आणि त्यातून निर्माण झालेला प्रदूषणाचा प्रश्न यावर उपाय म्हणून 'ग्रीन पुणे' होण्याच्या दृष्टीने स्थायी समिती ठराव क्र. 315, दि.14/02/2020 अन्वये विट्रो मोटर्स इलेक्ट्रीक बाईक रेटींग प्रोजेक्ट राबविण्यास स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे. सदर प्रस्ताव शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून विट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने इलेक्ट्रीक दुचाकीचा प्रस्ताव मांडला होता.

या प्रस्तावामध्ये पुणे शहारामधील मुख्य रस्त्यावरील 500 ठिकाणी 2000 चार्जिंग पॉंइंट्स उभारण्याचे नियोजन असून शहरामध्ये सुरवातीच्या टप्प्यांमध्ये 3000 हजार ते 5000 हजार ई-दुचाकी वापरात आणण्याची संकल्पना आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक दुचाकी इलेक्ट्रीक वाहतूक सेवा देणारे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे.

अंतिम मान्यतेनंतर तीन महिन्यानंतर हा प्रकल्प पुणेकरांसाठी तयार होणार आहे. सदर प्रकल्पासाठी सर्व गुंतवणुक विट्रो मोटर्स प्रा.लि. कंपनी करणार असून पुणे महानगरपालिकेची शून्य आर्थिक गुंतवणूक असणार आहे. ग्रीन पुणेसाठी इलेक्ट्रीक–बाईक रेटींग प्रोजेक्ट ही संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असून या इलेक्ट्रीक बाईकने प्रवास करण्यासाठी नागरिकांना खालीलप्रमाणे पैसे आकारण्यात येणार आहेत.

भाडे दर /- कि. मी . अॅव्हरेज  
महिना 3800/- 4000  0.95
आठवडा 1900/- 1000   1.9
प्रति दिन 450/- 150  3
प्रति तास 100/-  25   4
प्रति. की. मी.  4/- 1     4

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Date : हजारो विद्यार्थ्यांचा संभ्रम अखेर दूर; एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा आता 'या' तारखेला होणार!

Dhule Municipal Corporation : धुळे मनपाचे 'स्वप्न' खरे होणार का? पाचकंदील मार्केट पुनर्विकासावर ₹५४ कोटी खर्च; ८२ कोटी उत्पन्न मिळवण्याचे आव्हान

Latest Marathi News Update : “बांगलादेशला कांदा निर्यात परवानगी तरीही लासलगावात दर नरमच – शेतकऱ्यांचा पदरी निराशा”

Virar Fire : विरार कारशेडमधील शेकडो झाडांची होळी; भारतीय रेल्वे प्रशासनावर अखेर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

IND vs SA, ODI: टीम इंडियाने मालिका जिंकली, पण ICC ने केली कडक कारवाई; नेमकं असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT