dr.sharvari Inamdar  Team esakal
पुणे

साडी नेसून पुश-अप; पुण्यातल्या महिला डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर (social media) एक वर्कआऊटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालायं..त्याची चर्चाही जोरदार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे: लॉकडाऊनमध्ये (lockdown) अनेकांनी घरबसल्या आपली खाण्याची हौस भागवून घेतल्याचे दिसून आले आहे. यावेळी वेगवेगळ्या रेसिपी तयार करुन त्यावर ताव मारल्याचे सोशल मीडियावर दिसून आले आहे. मात्र त्यानंतर वाढलेल्या तब्येतीचे (health) काय असा प्रश्न अनेकांना पडलायं, त्यावर काहींनी वर्कआऊटची (workout) तयारी केलीयं...सध्या सोशल मीडियावर (social media) एक वर्कआऊटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालायं..त्याची चर्चाही जोरदार आहे. (pune woman weight training at gym wearing saree video viral)

ज्यांनी नुकतीच वर्कआऊटसला (work out) सुरुवात केली आहे. त्यांनी पुण्यातल्या डॉक्टर शर्वरी इनामदार (shervari inamdar) यांचा व्हिडिओ पाहावा असा आहे. त्यात त्यांनी साडी नेसून पुश अप (push ups) मारले आहेत. त्या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळाली आहे. तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रेरणा हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून प्रेरणा घेऊ शकता. पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी आयुर्वेदमध्ये एम.डी.ची पदवी घेतली आहे. डॉ. इनामदार या नेहमीच जीममधील व्यायाम करतानाचे व्हिडिओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, त्यांचा साडीमधील वर्क-आऊट खूपच चर्चेत आला आहे.

dr. sharvari inamdar

गेली पाच वर्षे शर्वरी या फिटनेसचे वेळापत्रक नित्यनियमाने पाळत आहे. पुश-अप, पुल-अप आणि वेट-लिफ्टिंग सारखे व्यायाम त्या रोज करत आहेत. इतकंच काय तर हे सगळे व्यायाम त्या साडी नेसून अगदी सहजपणे करतात.

Dr. sharvari

याबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "खरे सांगायचे असेल तर, काही महिला दररोज साडी नेसत नाहीत. काहींना साडी नेसणे आरामदायक वाटत नाही. परंतु भारतीय महिला म्हणून जेव्हा आपण एखादा सण साजरा करतो तेव्हा आवर्जून पारंपारिक भारतीय पोशाखा परिधान करून साजरा करतो. म्हणूनच हा वारसा पुढे जपण्यासाठी आणि साडी नेसणे हा कुठे ही अडथळा ठरू नये म्हणून मी साडी नेसून व्यायाम करते. इतकेच नव्हे तर पुणे ते गोवा असा प्रवासही त्यांनी सायकलवरुन केला असून पुणे अंतराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन ही 2 तासात पूर्ण केली आहे.

शर्वरी यांनी साडी नेसून जीममध्ये वर्क आऊट करणाऱ्यांना या व्यायामाची प्रेरणा दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुण्यातील निर्बंध (Pune Unlock) 14 जून पासून शिथिल करण्यात आले असून या मध्ये जीमला सुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरु राहण्यास परवानगी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT