In Pune this year public Ganeshotsav will celebrated in simple way.jpg 
पुणे

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत महत्त्वाची बातमी; मंडळांनी घेतला निर्णय.

सकाळवृत्तसेवा

पुणे : जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय  मानाच्या व इतर मोठ्या गणपती मंडळांनी घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता गुरुवारी मंडळांच्या झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच गणेशउत्सवानिमित्त पुण्यात होत असलेला झगमगाट आता पारंपारिक साजरीकरणात बदलणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मंडळांनी उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर, अथर्वशिर्ष ,आरती असे सर्व धार्मिकविधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घ्यावी. रोजच्या धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत  तत्कालीन परिस्थितीनुसार आणि समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे, असे या बैठकीत ठरले. 

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, सौरभ धडफळे, केशव नेउरगांवकर, अनिरुद्ध गाडगीळ, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, राजू परदेशी, पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, नितीन पंडीत, विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गणरायाला मास्क लावू नका :
या बैठकीच्या माध्यमातून सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की, आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.
पुण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु

मिरवणुकीचा निर्णय परिस्थितीनुसार :
शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी देशभरातून नागरिक पुण्यात येत असतात. आकर्षक देखावे आणि विविध संकल्पना मांडणाऱ्या पुण्यातील विसर्जन मिरवणुका प्रसिद्ध आहेत. मात्र यावर्षी विसर्जन मिरवणुका देखील न निगण्याची शक्यता आहे. त्यावेळची परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

खुशखबर! आता पगारात होणार वाढ अन् पीएफमध्ये...
''साधेपणाने व शासनाच्या आदेशाला अधीन राहून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा, अशी चर्चा राज्यातील मंडळांबरोबर सुरू आहे. गणपती उत्सव ही सार्वजनिक ऊर्जा आहे. अनेक मंडळे कोरोनाबधितांना मदत करीत आहे. यावर्षी वर्गणीवर परिमाण होणार आहे. तसेच कोरोनाचा विचार करता सर्व मंडळांनी डामडोम न करता उत्सव साजरा करावा. आमचे मंडळ यावर्षी केवळ गाभाऱ्यात आरास करणार आहे. देखावा उभारणार नाही.''
- अशोक गोडसे अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT