In Pune a young man threw acid on the face of a married woman 
पुणे

भयानक! पुण्यात तरुणाने विवाहितेच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिडसारखे केमिकल

पाडुरंग सरोदे

पुणे : माहेरी आलेल्या विवाहितेस भेटण्यासाठी बोलावून तरुणाने तिच्यावर अ‍ॅसिडफेकल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेत विवाहित तरुणीचा चेहरा भाजला असून तिला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजता पर्वती दर्शन येथे घडली. 

अबुझर अयाज तांबोळी (वय 18, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 Breaking : बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर सापडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अबुझर यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. आठ महिन्यांपूर्वी फिर्यादीचे त्यांच्या नात्यातील एका मुलासमवेत विवाह झाला होता. त्यानंतर ती तिच्या सासरी नांद होती. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त विवाहित तरुणी तिच्या पतीसमवेत माहेरी आली होती. सोमवारी सकाळी अबुझर याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार, तरुणी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पर्वती दर्शन येथील भांबरे शाळेजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात त्यास भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तरुणीने त्यास "आता तु माझ्या नादी लागू नको, माझे लग्न झाले आहे' असे समजाविले. मात्र अबुझर याने रागाच्या भरात तिच्याशी भांडणे सुरू केली. "तुझे अपने आप पर गुरुर है ना, देख मै तेरा गुरूर कैसे तोडता हूँ' असे म्हणत त्याने त्याच्या हातामध्ये लपवून ठेवलेले असिडसारखे द्रव्य फिर्यादीच्या चेहऱ्यावर टाकले. त्यामध्ये फिर्यादीच्या चेहऱ्याचा डावा भाग भाजला. गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला तिच्या कुटुंबीयांसह व स्थानिक नागरिकांनी उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले.

नावाचा शॉर्टफॉर्मच तसा आहे, राग मानू नये; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. माहिती दत्तवाडी पोलिसांनी अबुझर तांबोळी यास तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे करीत आहेत. 

राज ठाकरे म्हणाले,' तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो'य

(edited by sharayu kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

SCROLL FOR NEXT