crime  sakal
पुणे

पुणे : विकास धुमाळकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज

आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्यातील हिस्सा गटशिक्षणअधिका-यास दिल्याचे आरोपीने मान्य केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शासकीय कोट्यातून (आरटीई ) एका मुलीस पहिलीत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकाकडे ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पालक शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज मिळाले आहेत. त्यातील काही प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्यातील हिस्सा गटशिक्षणअधिका-यास दिल्याचे आरोपीने मान्य केले आहे.

या प्रकरणात हवेली पंचायत समितीच्या शिक्षणअधिका-‍यासह प्रवेश पडताळणी समिती सदस्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रामदास शिवनाथ वालझाडे (वय ५०, गटशिक्षणधिकारी, वर्ग २, पंचायत समिती ता. हवेली) आणि विकास नंदकुमार धुमाळ (वय ४०, प्रवेश पडताळणी समिती सदस्य, पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील पदपथावर सापळा रचून एसीबीच्या पथकाने एक सप्टेंबर रोजी दुपारी ही कारवाई केली.

मुलीस आरटीई शासकीय प्रवेश कोट्यातून पहिलीत प्रवेश मिळावा यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. मात्र, शिक्षण विभाग पंचायत समिती हवेली यांनी फिर्यादींच्या मुलीचा प्रवेश अर्ज अपात्र केला होता. म्हणून त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद येथे अपील केले होते. फिर्यादींच्या घरी पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि धुमाळ आले. त्यांनी मुलीचे प्रवेश अर्ज पात्र करून देतो परंतु त्यासाठी ७० हजार द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र, ही शासकीय फी नसून लाच असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.

अटक दोघांना गुरुवारी (ता.२) न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांचे आवाजाचे नमुने घेण्यासाठी, आरटीई प्रवेश संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त असून त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे का याची पडताळणी करण्यासाठी, वालझाडे यांच्या अंगझडतीमध्ये बॅगेत ४५ हजार रुपये मिळाले असून त्याबाबत योग्य उत्तर दिलेले नसून त्याबाबत तपास करायचा आहे. यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार या करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr D Y Patil Passed Away : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रात शोककळा

Ladki Bahin Yojana: १५०० नाही ३००० मिळणार! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

Satara Crime: लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे अत्याचार; पाटणमधील शिक्षक अटकेत

Marathi Live Updates News: शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीला वाहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Faridabad Teacher Murder : शिक्षिकेची शाळेत घुसून निर्घृण हत्या, ३२ सेकंदात केले ३४ वार; CCTV मध्ये कैद झाला थरार

SCROLL FOR NEXT