पुणे

#PuneMetro महापालिकेच्या नव्या इमारतीसमोर मेट्रो स्थानक 

सकाळवृत्तसेवा

पुणे : वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावरील शिवाजीनगरमध्ये कॉंग्रेस भवन येथून सुरू होणाऱ्या कामात पहिल्यांदाच स्थानक उभारणीच्या कामाला सुरवात झाली आहे. जमिनीपासून सुमारे 14 मीटर उंचीवर हे स्थानक असेल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. 

काँग्रेस भवन ते नवा पूल दरम्यान पहिल्या टप्प्यात काम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नवा पूल ते धान्य गोदामादरम्यान हे काम होईल, अशी माहिती वनाज- रामवाडी मार्गाचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. महापालिकेच्या नव्या इमारतीसमोर मेट्रोचे स्थानक होणार आहे. 

नदीपात्रातील काम सुरू 
पावसाळ्यामुळे मुठा नदीच्या पात्राशेजारील जागेतील काम दोन महिने बंद होते. आता ते सुरू झाले आहे. नदीपात्राशेजारील जागेत 59 खांब उभारायचे असून त्यातील 25 खांब उभारले आहेत. कर्वे रस्त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाशेजारून मेट्रो नदीपात्रात जाणार आहे. तेथून नदीपात्राशेजारील जागेतून कॉंग्रेस भवनसमोरून ती पुन्हा रस्त्यावर येईल. त्या ठिकाणी महापालिका भवन स्थानक असेल. तेथून ती पुढे धान्यगोदामाच्या स्थानकात जाईल व पुढे रामवाडीकडे रवाना होणार आहे. 

असे असेल पालिकेसमोरील मेट्रो स्थानक 
- स्थानकाची रुंदी 140 मीटर 
- जमिनीपासून 14 मीटर उंचीवर 
- 11 पैकी 10 खांब स्थानका 
- चारपैकी दोन सरकते जिने 
- प्रवाशांच्या वाहनांसाठी विस्तृत जागा 
- प्लॅटफॉर्मवर एलईडी स्क्रीन, वेळापत्रक 
- मोफत वाय-फाय, उपाहारगृह 
- दिव्यांगांसाठी विशेष प्रकारच्या टाइल्स 

वनाज-रामवाडी मार्गावर महापालिका भवन हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथे असणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
- अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, पुणे मेट्रो 

- पुणे मेट्रोच्या कामाबाबत आपले मत कळवा... 
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT