पुण्यशलाका sakal
पुणे

पुण्यशलाका’ची काश्मीरमध्ये सायकल राईड

३० ते ६० वयोगटातील महिलांनी सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्वात एक आगळा-वेगळा व स्त्री शक्तीला प्रोत्साहित करणारा उपक्रम म्हणजेच बारामुल्ला ते कमान अमन सेतू येथे महिलांसाठी होणारा ‘राईड काश्मीर. जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या सैन्यदलाच्या १९ इनफन्ट्री डिव्हिजनतर्फे देशाच्या महिलांसाठी हा अनोखी सायकल राईड मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये पुण्यातील ‘पुण्यशलाका’ हा महिलांचा गट सहभाग घेत आहे.  

पुण्यशलाका या गटातील महिलांद्वारे आतापर्यंत देशांतर्गत व देशाबाहेर सायकल मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. काश्मीर येथील सायकल राईड मोहिमेत डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. अश्र्विनी कुलकर्णी, डॉ. अनघा दुधभाते, रोहिणी टिळक, साधना लेले, भाग्यश्री पराडकर, सोनाली ओगले, देवयानी साधू, डॉ. मैथिली जोग, सीमा सावंत आणि रोहिणी ढवळे अशा विविध क्षेत्रातल्या ३० ते ६० वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला आहे. ही मोहीम रविवारी (ता. १२) होणार असून यासाठी पुण्यातील महिला सायकलिस्टचा गट शनिवारी (ता. ११) विमानाने काश्मीरसाठी जाणार आहोत.

याबाबत साधना लेले यांनी सांगितले, ‘‘देशाच्या सीमेवर लढा देऊन देशबांधवांचे रक्षण करून न थांबता देशातील विशेषतः सीमाभागातल्या बांधवांचे देशाच्या इतर राज्यातील बांधवांशी संबंध अधिक प्रेममयी व सशक्त व्हावे. तसेच काश्मीरच्या नागरिकांना देशाच्या इतर संस्कृतीची माहिती मिळावी, शालेय मुलांना सायकलचे महत्त्व पटवून देणे. या सर्व उद्देशाने ही सायकल राईड सैन्यदलाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातून १०० हून अधिक महिला सहभाग घेणार आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला या उपक्रमाची माहिती मिळाली. तेव्हाच या मोहिमेत सहभाग घेण्याचे आम्ही ठरविले.

सेनेच्या निगराणीत होणार प्रवास :

कधी निसर्गाचा, कठीण रस्त्यांचा तर कधी प्राप्त केलेल्या यशाचा म्हणून प्रत्येक सायकल सफारीचा एक वेगळा आनंद असतो. मात्र ही सायकल मोहीम वेगळी आहे. सैन्यदलाने याचे आयोजन केल्यामुळे हा अनुभव इतर मोहिमांच्या तुलनेत नक्कीच वेगळा असेल. सेनेच्या निगराणीत हा प्रवास सायकलवरून करायला मिळणार आहे. ही एक अनमोल संधी आहे, असे या महिला सायकलिस्ट गटाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेच्या वाढत्या दरावर राजू शेट्टींचा सवाल; ‘साखरेच्या दरवाढीत २० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार?’

Visakhapatnam Schoolboy Death : होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेचा ओरडा; ६ वर्षीय चिमुकला वर्गातच कोसळला, मृत्यूने खळबळ, LIVE VIDEO VIRAL

Arjun Tendulkar: मुंबई-गोवा अन् आता? अर्जुन तेंडुलकर कोणत्या संघाकडून खेळणार? ओमान दौऱ्यावर न गेल्याने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांना बेदम मारहाण

Kolhapur Ganeshotsav: ‘प्रेशर मिड’ वापरून आवाज वाढविल्यास सिस्टीम जप्त प्रिया पाटील; साउंड सिस्टीम, लाईट असोसिएशनसोबत पोलिसांची बैठक

SCROLL FOR NEXT