corona1 
पुणे

पुरंदरमधील कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या पत्नी व सूनेचाही रिपोर्ट पाॅझिटिव्ह

दत्ता भोंगळे

गराडे (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोरोनाच्या प्रार्दुभावातून भिवडी येथील दिघे- भिंताडेवस्ती येथील ७० वर्षीय एका ज्येष्ठ नागरिचा मृत्यू पुण्यातील हॉस्पिटलमध्ये झाला होता. आज त्या व्यक्तीची पत्नी व सून यांचाही कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भिवडीतील कोरोना रुग्णांचा आकडा आता सहा झाला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.

भिवडीतील या कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज मिळाला. त्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीची ६५ वर्षीय पत्नी व २८ वर्षीय सून पाॅझिटिव्ह आल्या आहेत. हे सर्व दिघे- भिंताडे वस्ती येथे रहातात. तर, भिवडीतील वरची भिंताडेवस्ती येथील ३२ वर्षीय तरुण व गाठाणातील येथील ३२ वर्षीय तरुण सर्दी- खोल्याने आजारी होते. त्यामुळे एका खाजगी दवाखान्यात गेले. पण, तेथे फरक न पडल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात गेले. नंतर तेथून वानवडीला स्वतः गेले. तेथे गेल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. तेथून ते सासवड येथील चुलत्याच्या फ्लॅटवर आहेत, अशी माहिती ग्रामसेवक रोहित अभंग यांनी दिली.

भिवडी कंटेनमेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आला आहे. तर, गावात बंद ठेवण्यात आले आहे. गावात औषध फवारणी करण्यात आली असून, लोकांना सक्तीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर बिगर मास्क व्यक्ती फिरताना सापडला तर त्याला ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, असे ग्रामसेवक रोहित अभंग यांनी सांगितले.

कोरोनामुळे मजूर झाले गायब...
भिवडीत बऱ्यापैकी शेतकरी भाताचे पीक घेतात. नुकत्याच झालेल्या पावसात शेतकऱ्यांची भात लागवड चालू होती. पण, गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे समजल्यानंतर लागवड करणारे मजूर पळून गेले. त्यामुळे भात लागवड अर्ध्यावरच रखडली असल्याचे शेतकरी श्यामकांत भिंताडे यांनी सांगितले.

Edited By : Nilesh J Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : वासनांध खरातच्या 'शिवनिका'च्या उत्पन्नात 7 वर्षांत तब्बल 74 पटींनी वाढ; 'धर्मादाय'कडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून गंभीर बाब उघड

काव्या होणार आई पण नंदिनीच्या नशिबी ते सुख नाही ! मालिकेतील नवीन ट्विस्टने प्रेक्षक नाखुष

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT