पुणे

मंचर : पोल्ट्री व्यवसायिकांना 'अच्छे दिन' येणार, कारण...

डी. के. वळसे पाटील

मंचर : कोरोना लॉकडाऊन पाठोपाठ बर्ड फ्ल्यूने थैमान घातले होते. पक्षी खरेदीचे बाजारभाव ४० ते ५० रुपये किलो पर्यंत खाली आले होते. या तिहेरी संकटामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर या चार तालुक्यांतील शेतकरी कुटुंबातील तरुणांनी उभारलेले सहा हजार पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. सोमवार (ता. १) पर्यंत ६८ रुपये किलोचे बाजारभाव होते. रविवारी (ता. ७) ९० ते ९५ रुपये प्रती किलो पक्षी खरेदीचे बाजारभाव झाले आहेत. खरेदीचे बाजारभाव प्रतिकिलो शंभरी ओलांडतील, अशी माहिती घाऊक खरेदीदारांकडून व्यक्त केली जात आहे. पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुके ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. मंचर (ता.आंबेगाव) येथील उर्जा फीड्स अँड अँग्रो कंपनीसह एकूण आठ कंपन्या या भागात पोल्ट्री व्यावसायिकांबरोबर काम करत आहेत. एक हजार पोल्ट्री व्यावसायिकांबरोबर उर्जा फीड्सने करार केले आहेत. पोल्ट्री चालकांना पिल्ले, खाद्य, औषधे व संगोपनाचा खर्च दिला जातो.

४० ते ४५ दिवसानंतर कोंबडीची पूर्ण वाढ होते. त्यानंतर कंपनीचे लोक कोंबड्या घेऊन जातात. पशु खाद्याचे व औषधांचे दर वाढले आहेत. त्यामुळे दोन ते अडीच किलो वजनाच्या कोंबडीसाठी सरासरी १५० रुपये खर्च येतो. सध्या मिळत असलेल्या ९० रुपये प्रती किलो खरेदीच्या बाजारभावामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या काळातील झालेला तोटा भरून येण्यास काही प्रमाणात मदत होईल, अशी माहिती निरगुडसर येथील जय समर्थ पोलट्रीचे मालक  प्रकाश एकनाथ वळसे पाटील यांनी दिली.

मध्यंतरी बर्ड फ्लूच्या अफवेमुळे नुकसान होईल. या भीतीने कितीतरी शेतकरी बांधवांनी आपले पोल्ट्री शेड रिकामे ठेवणे पसंत केले. उन्हाळ्यात बहुतेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आढळते. पाण्याअभावी बहुतेक जण पोल्ट्रीमध्ये उत्पादन घेण्याचे टाळत असतात. त्यामुळे ब्राॅयलर कोंबड्यांचा तुटवडा निर्माण होऊन अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे, असे आंबेगाव तालुका पोल्ट्री असोशियशनचे अध्यक्ष प्रकाश तपकीर यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यात चिकन विक्री करणारी ५०० हून अधिक दुकाने आहेत. सध्या किरकोळ दुकानदारांना १०५ रुपये किलो बाजारभावाने जिवंत ब्राॅयलर कोंबडी मिळते. पंख, पाय, मुंडी, आतडी हे वाया जाते. अनेकदा कोंबड्या मरूनही जातात. होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सध्या ग्राहकांना १८० रुपये प्रती किलो बाजार भावाने विक्री केली जाते. उन्हाळ्यात हे बाजारभाव प्रती किलो २०० रुपयेपर्यंत  जाण्याची शक्यात आहे, अशी माहिती कळंब येथील चिकन विक्रते इसाख शेख यांनी दिली.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतून दररोज पुणे व मुंबई भागात विक्रीसाठी पाठविलेल्या जात असलेल्या ब्राॅयलर कोंबड्याचे वजन सरासरी चार लाख ५० हजार किलो ते पाच लाख किलोपर्यंत आहे. पोल्ट्री व्यवसायातून होणारी दररोजची आर्थिक उलाढाल चार कोटी ५० लाख ते पावणे पाच कोटी पर्यंत आहे. पोल्ट्री व्यवसायामुळे बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. -प्रमोद हिंगे पाटील, अध्यक्ष उर्जा फीड्स अँड अँग्रो कंपनी मंचर

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT