Milk File Photo
पुणे

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले

कोरोनाच्या कडक निर्बंधांचा परिणाम; प्रतिलिटर ५ रुपयांची कपात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांचा दूध व्यवसायाला जबर फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी, चालू आठवड्यात दूध पावडर आणि बटरच्या (लोणी) दरात प्रति किलो ५० रुपयांनी घट झाली. यामुळे दूध पावडर उत्पादक प्रकल्पांनी दूध खरेदीदरात प्रति लिटर पाच रुपयांची कपात केली आहे. यामुळे दूध खरेदीदर पुन्हा २५ रुपयांवर आला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात दुधाचे खरेदीदर वाढतात. कारण, उन्हाळ्यामुळे बेकरी उत्पादने, कुल्फी, दही, ताक, लस्सीची मागणी वाढत असते. या पदार्थांच्या निमिर्तीसाठी दूध, दूध पावडर आणि बटरची खरेदी वाढत असते. यंदा मात्र या खरेदीत उन्हाळ्यात ३० टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने दूध पावडर व बटरचे भाव घसरल्याचे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

राज्यात दूध पावडरचे दर वाढले की दूध दर वाढतात आणि पावडरचे दर कमी झाले की दूध खरेदीदर कमी होण्याची पद्धतच पडली आहे. यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. राज्यातील गाईच्या दुधाचा खरेदीदर सर्व खासगी व सहकारी दूध संघांनी एकसमान ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार गाईच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये दर देण्यावर सर्व दूध संघांचे एकमतही झाले होते. हा निर्णयही हवेत विरला आहे. दोन आठवड्यांपूर्वी दूध पावडरचा दर प्रतिकिलो २८० रुपये तर, बटरचा दर प्रतिकिलो ३३० रुपये होता. आता पावडरचे दर प्रतिकिलो २३० तर, बटरचा दर २८० रुपये झाला आहे.

राज्यातील दूध संस्थांकडून नेहमी दूध खरेदीदरात चढ-उतार होत असल्याने राज्यातील दूध संस्थांवरील शेतकऱ्यांचा विश्‍वास उडू लागला आहे. हे थांबण्याची गरज आहे. दुसरीकडे परराज्यातील संस्था कमी दर देऊनही शेतकऱ्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करू लागल्या आहेत. ही राज्यातील दूध संस्थांसाठी धोक्याची घंटाच आहे. संचारबंदीमुळे खूप अडचणी वाढल्या आहेत.

- प्रकाश कुतवळ, सचिव, राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Loss Compensation : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात जमा होणार 2500 रुपये; सरकारचा अधिकृत आदेश जारी, 50 लाख शेतकऱ्यांना लाभ अपेक्षित, 17 अटी लागू

Odisha Flood: ओडिशातील तब्बल ३०० गावांना पुराचा वेढा; ‘अर्णव’ चक्रीवादळाचा परिणाम; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

३८ धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही विजयाचा डाव पलटला! सहाव्या नंबरवर आलेल्या गोलंदाजाने अशक्य ते शक्य केलं! क्रिकेट विश्वात नवा विक्रम!

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट; जाणून घ्या कोकण ते विदर्भात कसे असेल हवामान? IMD चा नवा अंदाज

Sangli District Bank Election : उमदीत पवार बंधूंवर अपहरणाचा गुन्हा; पवार-पडळकर समर्थकांत वादावादी, सांगलीच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT