Pune-University 
पुणे

प्रश्‍नसंच उपलब्ध पण काही विषयांचेच

ब्रिजमोहन पाटील

पुणे - अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या विषय निहाय प्रश्‍नसंच उपलब्ध करून देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला, पण शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे 1 हजार 700 पैकी 1 हजार 100 विषयांचे प्रश्‍नसंच उपलब्ध झाले. अनेक विद्यार्थ्यांच्या चार विषयांपैकी एक ते दोन विषयांचेच प्रश्‍नसंच मिळाले. तर बॅकलॉगच्या विषयांचे प्रश्‍नसंच उपलब्ध होणार नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रश्‍नांचे स्वरूप कळावे यासाठी प्रत्येक विषयाच्या एकूण प्रश्‍नसंचातील 20 प्रश्‍न उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला.

शुक्रवार सायंकाळपासून या प्रश्‍नसंचाच्या पीडीएफ फाइल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले. शनिवार सकाळपासून विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचे प्रश्‍नसंच मिळतील यासाठी लॉगइन केले, पण त्यांना एक ते दोन विषयांचेच प्रश्‍नसंच मिळाले. एमकॉमच्या अर्थशास्त्र विषयाचे तिसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावरील प्रश्‍न संचात असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.

विद्यापीठातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगलॉगच्या विषयांचा 100 टक्के अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना त्या विषयांचा नमुना प्रश्‍नसंच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. नियमित विषयांचे प्रश्‍नसंच अपलोड करण्याचे काम सुर आहे. शनिवारी सायंकाळ पर्यंत नियमित परीक्षेतील सुमारे 1 हजार 700 विषयांपैकी 1 हजार 100 विषयांचे प्रश्‍नसंच अपलोड झाले आहेत. इतर विषयांचेही अपलोडींग लवकरच पूर्ण होईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT