rain damage to watermelon fruit
rain damage to watermelon fruit  Sakal Media
पुणे

खेड तालुक्यात कलिंगड फळाची गारपिटीने धूळधाण

महेंद्र शिंदे

कडूस : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बुधवारी (ता.14) सायंकाळी विजांच्या लखलखाटासह गारांच्या अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अवस्था 'होत्याचे नव्हते' झाली. कोहिंडे येथील बाजीराव विठ्ठल कुटे यांच्या दोन एकर शेतातील तोडणीस आलेल्या कलिंगडाच्या पिकाची गारपिटीने झोडपल्याने अक्षरशः धूळधाण झाली. खेड तालुक्यातील कडूस, रानमळा, गारगोटवाडी, कोहिंडे, वाशेरे, वेताळे, सायगाव, साबुर्डी, साकुर्डी, वाजवणे, औदर, येणवेसह पश्चिम पट्ट्यातील बहुतांश गावांना बुधवारच्या गारपिटीचा तडाखा बसला.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुमारे तासभर गारांसह अवकाळी पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. फुलोऱ्यातील बाजरीसह साठवण करून ठेवलेला जनावरांचा चारा, अरणीतील कांदा, शेतातली धना-मेथीसह आंब्याचे नुकसान झालेच पण शेतातील तरकारी पिकांसह फळपिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले. कोहिंडे येथील कुटे यांनी दोन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरमध्ये कलिंगडाची लागवड केली होती. कलिंगडाचे पीक ऐन भरात आले होते. दोन दिवसात पिकाचा पहिलाच तोडा करण्याचे नियोजन कुटे यांनी आखले होते. पण बुधवारच्या गारपिटीच्या पावसाने घात केला.

गारपिटीच्या तडाख्यात कलिंगडाची अक्षरशः धूळधाण झाली. गारांनी झोडपल्याने पिकाचा शेतातच चिखल झाला. यात सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कुटे यांचे म्हणणे आहे. कोरोनाची महामारी त्यात शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी अगोदरच अर्धमेला झाला आहे. त्यात दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुन्हा अवकाळी गारपिटीच्या पावसाने झोडपल्याने बळीराजाचे अवसान गळाल्यासारखी अवस्था झाली आहे. सर्वच बाजूने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT