Rain sakal
पुणे

पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रात 'या' दिवशी पावसाची शक्यता: हवामान विभाग

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे जिल्हा आणि दक्षिण महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात अंशत: ते सामान्यत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून 3 ते 5 मार्चच्या दरम्यान काही ठिकाणी दिवसाचे तापमान किंचित कमी होऊ शकतं. त्यामुळे या काळात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Pune)

हवामान खात्याने म्हटलंय की, 3 मार्चची संध्याकाळ ते 5 मार्च या कालावधीत काही ठिकाणी खूप हलका पाऊस पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. IMD च्या मते, मंगळवारी कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरावर विषुववृत्तीय हिंदी महासागरावर पसरलंय.

IMD पुण्यातील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी याबाबतची माहिती देताना म्हटलंय की, “पुणे शहरात 3 आणि 4 मार्च रोजी खूप हलक्या पावसाची शक्यता आहे. या दिवसांत शहरामध्ये अंशतः ते सामान्यतः ढगाळ वातावरण असू शकते. मात्र, पुणे जिल्हा, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3-4 मार्च रोजी 5 मार्च सकाळपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कश्यपी पुढे म्हणाले की, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिणेकडील भारताच्या काही द्वीपकल्पीय भागांमध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात या भागांमध्ये अंशतः ढगाळ आणि सामान्यतः ढगाळ आकाश दिसू शकतं. तसेच दिवसाच्या तापमानातही किंचित घट दिसू शकते. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या जोरदार आग्नेय वाऱ्यांसह, महाराष्ट्रातील या प्रदेशांवर वाऱ्याचा थोडा परिणाम होऊ शकतो, सामान्यत:, महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीला पाऊस पडत नाही. पण आता ती शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT