Raj Thackeray called Ajay Shinde in the Pune rally as Kishor Shinde 
पुणे

Vidhan Sabha 2019 : अन् राज ठाकरे पुण्याच्या सभेत चुकले

ज्ञानेश सावंत

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या पहिल्यावहिल्या प्रचार सभेत तोऱ्यात भाषणाला प्रारंभ केला; पण कोथरुडमधील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटलांचा चंपा अशी खिल्ली उडविल्यानंतर राज मात्र चुकले. या "चंपा' ची चंपी करण्यासाठी आमचा अजय शिंदे असल्याचे राज यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र, कोथरुडमधून भाजपच्या चंद्रकांत पाटलांविरोधात मनसेचे किशोर शिंदे रिंगणात आहेत. राज यांनी कोथरुडच्या शिंदेऐवजी कसब्यातल्या शिंदेंना पुढे घेऊन पाटलांना हरविण्याची जबाबदारी अजयकडे असल्याचे बोलून दाखविले. या गोंधळामुळे किशोर शिंदे थोडेसे बुचकळ्यात पडल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवले. 

आज बाळासाहेब असते तर...-राज ठाकरे

मनसेच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांनी सोमवारी मंडईत प्रचार सभा घेतली. राज यांच्या "ईडी'च्या चौकशीनंतर त्यांच्या सभा आणि भाषणांचा नूर पालटला असला तरीही या सभेबाबत पुणेकरांत उत्सुकता होती. त्यामुळे निवडणुकीची धामधूम असूनही राज यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तेव्हा राज यांनी आपल्या खास शैलीत भाषणाला सुरवात केली आणि गेल्या आठवड्यातील नऊ ऑक्‍टोबरची आपली सभा पावसामुळे रद्द केल्याचे स्पष्ट केले. पुण्यात पाऊस नेम धरून पडत आहे. मात्र पावसामुळे पुण्यात इतके कसे काय घडते ? असा प्रश्‍न उपस्थित केला. तेव्हा गर्दीतून "चंपा', "चंपा'ची घोषणा देण्यात आली. त्यावर काय म्हणताय ? अशी विचारणा राज यांनी गर्दीला केली.

भाजप सेनेची रोज इज्जत काढत आहे : राज ठाकरे

राज यांनी थेट संवाद साधल्याने गर्दीतून पुन्हा "चंपा', "चंपा'चा नारा घुमला. "अरे काय म्हणताय ? ते कानावर येत नाही,' असे राज यांनी लोकांकडे पाहून सांगितले. त्यानंतर व्यासपिठावर राज यांच्या दिशेने येत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी लोक "चंपा' म्हणत आहेत, असे सांगितले. त्यावर राज यांनी आपल्या ठाकरी शैलीत म्हणाले, "चंपा...' ?????, या चंपाची चंपी करण्यासाठी अजय आहे, असे जाहीरपणे सांगितले. त्यावर प्रचंड हशाही पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. परंतु, पाटलांविरोधात अजय शिंदे नव्हे तर, किशोर शिंदे उमेदवार आहेत. ही चूक व्यासपिठावरच्या नेत्यांनीही राज यांच्या निदर्शनास आणून देण्याचे धाडस केले नाही आणि त्यामुळे राज यांनी आपली चूक कळाली नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT