राज ठाकरे  सकाळ
पुणे

राज ठाकरे पुण्यात दाखल; उद्या महाआरती अन् हनुमान चालिसाचे पठन

ठाण्यातील उत्तर सभेत राज यांनी राज्य सरकरला 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ठाण्यातील उत्तर सभेत टीकाकारांना उत्तर दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) त्याच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यासाठी (Pune) शहरात दाखल झाले आहेत. दोन दिवसीय दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti) औचित्य साधून महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खालकर चौकात असणाऱ्या मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. दरम्यान, ठाण्यातील उत्तर सभेत राज यांनी राज्य सरकरला 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे (Majjid Bhonge) उतरवा अन्यथा हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या भोंगाविरोधी आंदोलनाचा श्रीगणेशा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे. (Raj Thackeray News)

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा दावा असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ मे पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत.

दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत. सुमारे २० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्यांचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या दिवसभरातील राज ठाकरे यांचे अन्य कार्यक्रम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT