Raj Thackeray Sakal
पुणे

'रमजान सुरू आहे म्हणून... पण ३ तारखेला तयारीत राहा', राज ठाकरेंचे आदेश

ओमकार वाबळे

राज्यातील मशिदींच्या भोंग्यांवरून मनसेने मैदानात उडी घेतली आहे. येत्या ३ तारखेपर्यंत हे भोंगे न हटल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. ठिकठिकाणी सार्वजनिक पद्धतीने हनुमान चालिसा पठण मनसेच्या वतीने करण्यात येणार आहे. (Raj Thackeray in Pune)

ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज ठाकरे यांनी लगेच पुण्याकडे कूच करत राजकीय घडी बसवण्याचा प्रयत्न केला. पुण्यात येताच हनुमान जयंतीला त्यांनी महाआरती केली. यानंतर त्यांनी पुण्यात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच सामाजिक अँगलने या विषयाकडे पाहण्याचं आवाहन केलंय. आत्ता रमजान सुरू असल्याने मी शांत आहे. पण ते संपल्यावर तीन मे रोजी तयार राहा. माझ्या सर्व मनसैनिकांनाही तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray Speaks on Loud Speakers)

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांनी टीका केली. यावर प्रश्न विचारल्यानंतर लवंड्यांवर मी काही बोलणार नाही असा टोला ठाकरेंनी लगावला. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. लोकांनी त्याच अंगाने त्याकडे पहावं, असं ते म्हणाले.

या देशातील संविधान, न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांना धर्म महत्वाचा वाटत असेल तर त्यांना याच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे. राज्यात मला दंगली नकोत. कोणताही राडा नकोय. पण स्पीकरच्या भूमिकेवर ठाम असाल तर आमच्या आरत्याही तशाच पद्धतीने ऐकायला लागतील, असं ठाकरे म्हणाले.पाच वेळा भोंगे लावणार तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. आमच्या मिरवणुकांवर हल्ला होतो. मग आमच्या हातातही दगड घ्यायला लावू नका. आमचे हात बांधलेले नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

दोन मोठ्या घोषणा

एक मे रोजी औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यासोबतच पाच जूनला सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT