Budhani 
पुणे

'बुधानी वेफर्स'चे मालक राजूशेठ बुधानी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुण्यातील बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे मंगळवारी (दि.६) सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. बुधानी यांची 'बटाटा वेफर्स' उद्योजक अशी सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे. पुण्यात नव्हे, तर परदेशातही ते बटाटा वेफर्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी बनविलेल्या वेफर्सला परदेशातूनही मोठी मागणी आहे.

राजू यांचे मोठे चुलते बाबू यांनी ५५ वर्षांपूर्वी महात्मा गांधी रस्त्यावरील पुना ड्रग्स स्टोअर शेजारी छोट्या दुकानात बटाटा वेफर्स विक्री व्यवसाय सुरू केला होता. गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास वाढवत त्यांनी पुण्याबरोबर महाराष्ट्रातून परदेशात वेफर्स विक्री सुरू केली. दिवंगत राजू बुधानी यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला. आज महात्मा गांधी रस्त्यावरील तीन मजली इमारतीमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून मोठ्या प्रमाणावर बटाटा वेफर्स वेफर्स आणि इतरही खाद्य पदार्थांची निर्मिती करून विक्री केली जात आहे.

बटाटा वेफर्सचे एक नव्हे, दोन नव्हे चक्क दहाहून अधिक प्रकार त्यांच्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात जोपासली आहे. गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे होता. ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट ताजिया कमिटी आणि ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची अनेक संस्था आणि संघटनांनी दखल घेऊन त्यांना गौरविले आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

Pune Municipal Election : ''माघार घेतली म्हणून मंत्री निवडून आला, शब्द देऊन फडणवीसांनी दगा दिला''; भाजप कार्यकर्ता आता अजितदादांच्या पक्षाकडून लढणार

Latest Marathi News Live Update : आपच्या शहराध्यक्षाचा सायकल वरून येऊन निवडणुक अर्ज दाखल

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह; कुत्र्यांनी कुरतडून चेहरा केला विद्रूप, हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ असं काय घडलं?

BJP AB Form Controversy: नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, Video पाहा...

SCROLL FOR NEXT