पुणे

हेल्मेटसक्ती विरोधात ‘सविनय कायदेभंग रॅली’

सकाळवृत्तसेवा

पुणे -  शहरात वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवावी, या मागणीसाठी हेल्मेटसक्‍ती विरोधी कृती समितीच्या वतीने पोलिस आयुक्‍तालयावर गुरुवारी सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. यात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

समितीने गांजवे चौकापासून पोलिस आयुक्‍तालयापर्यंत रॅली काढून पोलिस आयुक्‍तांना निवेदन दिले. वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत दहा हजारांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलन केल्यानंतर हेल्मेट सक्‍तीला शहराच्या अंतर्गत भागात सूट दिली होती. 

शहरात बहुतांश अपघात खणलेले रस्ते, खड्डे, अशास्त्रीय गतिरोधक आणि असुरक्षित पदपथांमुळे होत आहेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणि मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी. त्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ हेल्मेट सक्‍ती लादणे चुकीचे आहे. रिक्षात चारच मुले असावीत किंवा पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण विरहित पदपथ असावेत, या न्यायालयाच्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप समितीने केले आहे. 

समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बापू पठारे, माजी महापौर अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, बाळासाहेब रुणवाल, धनंजय जाधव, संदीप खर्डेकर, श्‍याम जोशी, संजय बालगुडे, रूपाली पाटील,श्‍याम देशपांडे, शिवा मंत्री,  प्रदीप देशमुख, मंदार जोशी, सीताराम खाडे, संतोष शिंदे आदी रॅलीत सहभागी झाले होते.

हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात दुचाकीस्वारास गंभीर दुखापत होऊन जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट घातले पाहिजे. अपघाती मृत्यू रोखण्यासाठी हेल्मेट सक्‍तीला विरोध करण्याऐवजी पाठिंबा द्यावा. 
- शंकर पाचारणे, अध्यक्ष,  सेव्ह लाइफ यूजर्स असोसिएशन

आंदोलकांवरही कारवाई
रॅलीत विनाहेल्मेट सहभागी झालेल्या आंदोलकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ही रॅली सुरू असतानाच आंदोलकांना त्यांच्या मोबाईलवर वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे संदेश प्राप्त झाले. त्यापैकी काही आंदोलकांकडून दंडही वसूल करण्यात आला. दरम्यान, रॅलीच्या बंदोबस्तासाठी दुचाकीवर असलेल्या काही पोलिसांनी हेल्मेट घातले नव्हते. ही बाब पोलिस आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT