Ranjangaon Ganpati temple will be opened for devotees from Monday.jpg 
पुणे

रांजणगाव गणपतीचे मंदिर सोमवारपासून भाविकांच्या दर्शनासाठी होणार खुले

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे)  : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपतीचे मंदिर सोमवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तानी आज दिली.

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी मार्च महिन्यापासून दर्शनासाठी मंदिर बंद होते. राज्य सरकारच्या सूचनेनुसार सोमवार (ता.१६) पासून नागरिकांना महागणपतीचे दर्शन मिळणार आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना नियमाचे पालन करावे लागणार आहे. 

देवस्थान ट्रष्टचे विश्वस्त प्रा.नारायण पाचुंदकर, डॉ.संतोष दुंडे, ऍड विजयराज दरेकर व शेखर देव आणि व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी मंदिरात योग्य ती खबरदारी घेतली असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन मास्क, सॅनिटायझर व इतरत्र स्पर्श न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरळीतपणे व सुरक्षित दर्शन मिळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बँरिगेट लावण्यात आले आहेत. दोन व्यक्तींमध्ये  सामाजिक अंतर राहण्यासाठी दर्शन रांगेत चौकोनी खुणा करण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळच मास्कची तपासणी व सँनिटायझर करण्यात येणार आहे.

मंदिराच्या परिसरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक असून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गर्भवती महिला यांनी मंदिरात येणे टाळावे. मंदिरात सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. दर्शन गाभाऱ्यात  'श्री'चे दर्शन घेताना हात जोडून दर्शन घ्यावे इतरत्र कोठेही स्पर्श करू नये. मंदिरात दर्शनाला येताना प्रसाद, हार, नारळ व फुले घेऊन येणे टाळावे. मंदिरात प्रवेशद्वारावरच हात सॅनिटायझरने स्वच्छ करावे व थर्मल स्कॅनिंग करून नंतरच मंदिरात प्रवेश करावा, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT