पुणे

ऍट्रॉसिटीची भीती दाखवत उकळली 75 लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नामांकित डॉक्‍टरच्या मुलाविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून डॉक्‍टरकडून तब्बल ७५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही उर्वरित ५५ लाख रुपयांसाठी डॉक्‍टरकडे तगादा लावल्याने खंडणीखोराविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

मनोज अडसूळ-अत्रे (वय ४५, रा. नवी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने (रा. तपोवन सोसायटी, पर्वती) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा मुलगा डॉ. साहिल रासने यांच्याविरुद्ध एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात ऑक्‍टोबर २०१९ मध्ये विनयभंगाची तक्रार दिली होती. या प्रकरणासंदर्भात अडसूळ याने फिर्यादीस तुमच्या मुलाविरुद्ध विनयभंग, ॲट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, त्यास तीन ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी धमकी देत त्यांच्याकडे एक कोटी तीस लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीला खोटे आश्‍वासन देऊन त्याने त्यांच्याकडून धनादेशाद्वारे ५४ लाख व रोख रक्कम २१ लाख असे एकूण ७५ लाख रुपये घेतले. त्यानंतर उर्वरित ५५ लाख रुपयांची रक्कम न दिल्यास मुलास अटक  होईल, अशी धमकी देत पैशांसाठी तगादा लावला. 

याप्रकरणी फिर्यादी यांनी जयेश कासट यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. मात्र अडसूळ याने कासट यांनीच आपल्याकडे पैसे मागितल्याची तक्रार खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाकडे केल्याचे फिर्यादीच्या जबाबामध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाच्या पडताळणीनंतर पोलिसांनी अडसूळविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT