Kasaba Bypoll Election 
पुणे

Kasaba Bypoll Election : राज ठाकरेंचा भाजपला पाठिंबा तरी धंगेकर थेट मनसे कार्यालयात!

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील पोटनिवडणूक जोरदार चर्चेत आली आहे. शिवाय कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी आज मनसे कार्यालयात भेट दिली. 

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांनी मनसे शहर कार्यालय गाठले. कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मनसे कार्यालयात स्वागत देखील करण्यात आले. मात्र मसनेसे भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मनसेने जरी भाजपला पाठिंबा दिला तरी सुद्धा धंगेकर आज मनसेच्या शहर कार्यालयात गेले. यापूर्वी देखील त्यांनी मनसे त्यांना पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला होता. धंगेकर यांची आज प्रचारासाठी नवी पेठेत पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी याच भागात असलेल्या मनसेचे शहर कार्यालयात हजेरी लावली. धंगेकर कार्यालयात येताच मनसे नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. 

धंगेकर यांनी याआधी सुद्धा मनसे मधील आपले सहकारी, मित्र आहेत असं विधान केले होते. त्यामुळे मनसेने जरी भाजपला पाठिंबा दिला असला तरी शहर मनसेत अजूनही भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे शहर मनसे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT