Crime
Crime 
पुणे

कोरोनामुळे इस्टेट एजंटवर आली 'ही' वेळ; पैशांसाठी त्याने काय केले पाहा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे जो-तो आता पैसे कमावण्यासाठी चांगल्या पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. मात्र काही नागरिक गुन्हेगारीकडे वळत असल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. पैसे मिळत नसल्याने एका रियल इस्टेट एजंटने सोनसाखळी चोरी केली आहे.

मोहम्मद आतिफ इक्‍बाल शेख (वय 26 रा. रा. नाना पेठ) असे एजंटचे नाव असून समर्थ पोलिसांनी त्याला तासाभरातच अटक केली. भाजी आणण्यासाठी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करुन त्याने 35 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. मंगळवारी (ता.30) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रास्ता पेठेतील गृहलक्ष्मी अपार्टमेंटसमोर ह प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कपुरे, हवालदार साहिल शेख, संतोष काळे, निलेश साबळे, प्रमोद टिळेकर, सुमित कुट्टे आणि स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने दागिन्यांच्या दुकानासमोरुन शेखला अटक केली.

याबाबत उपनिरीक्षक कापुरे यांनी सांगितले की, सोनसाखळी हिसकावण्यासाठी आरोपीने हिरव्या रंगाची स्कूटर वापरल्याची माहिती या महिलेने दिली होती. यामुळे आम्ही त्या परिसरातील स्कूटर्स आणि दागिन्यांच्या दुकानांत तपासणी करण्याचे ठरविले. त्याचवेळी परिसरातील फोन कॉल्सच्या तपशीलांचे तांत्रिक विश्‍लेषण करण्यात आले. यामध्ये शेखचा नंबर शोधण्यात यश आले.

पोलिसांच्या पथकाला हिरव्या रंगाच्या स्कूटरचा चालक नाना पेठेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दागिन्यांच्या दोन दुकानांजवळ सापळा रचला. शेखला ताब्यात घेतल्यानंतर फिर्यादी महिलेला घटनास्थळी बोलावले. तिने तिची सोनसाखळी ओळखली. शेखने यापूर्वी असा काही प्रकार केला आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत.

उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने ते अस्वस्थ होते : 
शेख हा नाना पेठ आणि कॅम्प परिसरात रिअल इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. लॉकडाऊन काळात त्याचा व्यवसाय कमी झाला होता. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. यामुळे त्याने सोनासाखळी हिसकाली, अशी माहिती समोर आली आहे. "उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने आतिफ हे अस्वस्थ होते. ते पहाटे लवकर उठून सतत विचार करत,' अशी माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT