Registration for ITI admission across the state in 9 days beyond One lacks
Registration for ITI admission across the state in 9 days beyond One lacks 
पुणे

आयटीआय अ‍ॅडमिशनला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद; ९ दिवसात सव्वा लाखाच्या पुढे नोंदणी

ब्रिजमोहन पाटील

पुणे : इयत्ता १०वी नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून, ९ दिवसात सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी आणि शासकीय 'आयटीआय' प्रवेशासाठी १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सर्व प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईनद्वारे होत आहे. व्यवसाय शिक्षण विभागाने आयटीआय प्रवेशाला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारी जाहीर केली आहे. अर्ज करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने अर्जाची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली.

राज्यात शासकीय 'आयटीआय'ची संख्या ४१७ तर खासगी संस्थांची संख्या ५६९ आहे. या दोन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये मिळून १ लाख ४५ हजार ६३२ प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत १ लाख २९ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ७ हजार २३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यातील ९३ हजार ५२० विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरून अर्जनिश्‍चिती केली आहे. तसेच ७५ हजार ८१ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमही भरला आहे. गतवर्षी आयटीआय प्रवेशासाठी सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी प्रवेश घेतला होता.  

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

महत्वाच्या तारखा : आयटीआयचे वेळापत्रक
1. अर्ज करण्याची मुदत : १ ते १४ ऑगस्ट
2. प्राथमिक गुणवत्ता यादी : १६ ऑगस्ट
3. यादीवरील हरकती नोंदवणे : १६ ते १७ ऑगस्ट
4. अंतिम गुणवत्ता यादी : १८ ऑगस्ट
5. पहिली प्रवेश फेरी : २० ऑगस्ट 
 

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT