bhimashanka 
पुणे

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक...व्हिडिओ पहाच...   

अरुण सरोदे

शिनोली (पुणे) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर कोरोना विषाणूच्या महामारीमुळे भाविकांसाठी बंद केले आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारीही मंदिर परिसरात शुकशुकाट होता. मात्र, येथील पुजाऱ्यांनी पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक केला.

आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला... 
    
भीमाशंकर येथे दरवर्षी श्रावणी सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक व पर्यटक येत असतात. पंरतु, या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. त्यामुळे काल पहिल्या श्रावणी सोमवारीही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात शुकशुकाट होता. परिसरात बंदोबस्तासाठी घोडेगावचे पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.  

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...
    
कोरोना महामारी आंबेगाव तालुक्याचा हॉटेल व्यवसायावर आदळली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर हजारो भाविक व पर्यटक येत असतात. विशेषत: महाशिवरात्र व श्रावण महिन्यात उच्चांकी गर्दी असते. या भाविक व पर्यटकांवर येथील सुमारे 175 व्यवसायिकांचे पोट भरत असते. यामध्ये हॉटेल, लॉजिंग आदी व्यवसायांबरोबर स्थानिक नागरिक देवाचे बेलफूल, नारळ, कंदी पेढे, कटलरी, वनऔषधे, पावसाळ्यात प्लॅस्टीक कागद, रानमेवा, रानभाज्या विक्री करत असतात. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT