Galaxy Sakal
पुणे

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले रेडिओ आकाशगंगांचे अवशेष

अब्जावधी ताऱ्यांनी दैदीप्यमान होणाऱ्या एका आकाशगेंगाचा शेवटचा प्रवास टिपण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.

सम्राट कदम

पुणे - अब्जावधी ताऱ्यांनी दैदीप्यमान होणाऱ्या एका आकाशगेंगाचा (Galaxy) शेवटचा प्रवास टिपण्यात भारतीय शास्त्रज्ञांना (Indian Scientist) यश आले आहे. रेडिओ अकाशगंगेचा शोध घेणारे हे संशोधन पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे (एनसीआरए) (NCRA) शास्त्रज्ञ डॉ. धरमवीर लाल यांच्या नेतृत्वात झाले झाले. यासाठी नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) (GMRT) आणि चंद्रा एक्स-रे वेधशाळेचा वापर करण्यात आला आहे. (Remains of Radio Galaxies Discovered by Indian Scientists)

‘एबेल२०६५’ नावाने ओळखल्या जाणआऱ्या आकाशगंगा समूहातील एका रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध लागला आहे. आकाशात असे काही मोजकेच अवशेष शास्त्रज्ञांना माहित आहे. अद्ययावत जीएमआरटीमुळे अशा अवशेषांचे शोध घेणे शक्य झाले आहे. हे संशोधन ॲस्ट्रोफिजिकल जर्नलच्या १६ जुलैच्या अंकात प्रकाशित केले गेले आहे. डॉ. लाल म्हणतात,‘‘अवशेषीय रेडिओ आकाशगंगांचा अंत होण्याचा टप्पा अल्पकाळ असतो आणि आकाशात अशे काही मोजकेच अवशेष ज्ञात आहेत. हा शोध असे अधिकाधिक दुर्मिळ घटक शोधण्यासाठी अदययावत केलेल्या जीएमआरटीची क्षमता दर्शवितो.’’ आकाशगंगांच्या उत्क्रांतीचा भिन्न इतिहास आणि अंत होण्याच्या टप्प्यात असलेल्या सक्रिय आकाशगंगांच्या उत्क्रांतीला चालना देणाऱ्या यंत्रणांचा शोध याद्वारे घेतला जाऊ शकतो.

रेडिओ आकाशंगगा म्हणजे..

सक्रिय आकाशगंगांच्या मध्यभागी सूर्याच्या वस्तुमानाच्या दशलक्ष ते अब्ज पट वस्तुमानाचे एक अतीघन कृष्णविवर (ब्लॅक होल) असावे, असा विश्वास आहे. अतीघन कृष्णविवर आसपासच्या भागातून अधिक सामग्री आकर्षित करतात. तसेच ते देखील केंद्रकामधून लाखो प्रकाशवर्षे दूरपर्यंत सामग्री आणि ऊर्जेचे लोट बाहेर फेकतात. अशा आकाशगंगांचा सक्रिय टप्पा कित्येक दशलक्ष वर्षे टिकू शकतो, त्यानंतर केंद्रकातील आण्विक प्रक्रिया थांबते आणि रेडिओ उत्सर्जन नष्ट होण्यास सुरवात होते. रेडिओ आकाशगंगांचा हा चरण सक्रिय आकाशगंगांचा अंत होण्याचा शेवटचा टप्पा दर्शवितो आणि तो बहुतेकदा अवशेषीय किंवा अंतिम टप्पा म्हणून संबोधला जातो.

या संशोधनाचे वैशिष्ट्ये

- अवशेषीय आणि पुनर्जिवित रेडिओ आकाशगंगाच्या शोधामुळे त्यांच्या उत्क्रांतीवर, तसेच सक्रिय आकाशगंगांच्या कालचक्रावर प्रकाश पडेल

- अवशेषीय रेडिओ आकाशगंगा अधिकच दुर्मिळ आहेत. कारण त्या अल्पायुषी असल्यामुळे ओळखणे कठीण होते. आता मात्र अद्ययावत जीएमआरटीच्या सहाय्याने असे शोध घेणे शक्य होत आहे.

- जीएमआरटीची रेडिओ लहरींतून मिळणारी आणि चंद्रा एक्सरेची क्ष-किरणांतून मिळणारी प्रतिमा एकत्र करून अशा अवशेषीय रेडिओ आकाशगंगामधील संभाव्य धोक्यांचा इशारा दिसन शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT