पुणे

Coronavirus : जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोसायट्यांमधील रहिवाशांना बाहेर जाण्याची गरज नाही

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील मोठ्या सोसायट्यांमधील रहिवाशांना बाहेर जाण्याची गरजच राहिलेली नाही. त्यांनी मॉल, स्थानिक विक्रेते यांच्याशी "टाय-अप' केल्याने त्यांना सर्व साहित्य मिळत असल्याने त्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. 

शहरात सर्वत्र नाकाबंदी आहे. तरीही जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागते. याला काही सोसायट्या अपवाद ठरत आहेत. त्यांना भाजी, फळे, किराणा आदी सर्व जीवनावश्‍यक वस्तू रास्त दरात सोसायटीच्या आवारात मिळत आहेत. सोसायट्यांच्या बाहेर तीन दिवसांतून एकदा भाजी, ब्रेड, फळे मागविली जातात. तसेच सोसायट्यांच्या आवारातील मैलाशुद्धीकरण प्रकल्प, जनरेटरसाठी आठवड्याला शंभर ते दोनशे लिटर डिझेल लागते. टॅंकरद्वारे ते थेट सोसायट्यांच्या जनरेटरमध्ये टाकले जाते. 

या सुविधांसंदर्भात सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यास सहकार खात्याचे संयुक्त संचालक संतोष पाटील, सहकार उपनिबंधक शाहूराज हिरे, फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी सवाई, सरचिटणीस के. सी. गर्ग आदी उपस्थित होते. त्यानंतर अंमलबजावणी सुरू झाली. 

सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर मॉलच्या मोबाईल ऍपद्वारे घरपोच किराणा मिळत आहे. 25 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या किराणाची मागणी येईल तेथे तो पोचविला जातो. घरपोच औषधांसाठी काही विक्रेत्यांशीही टाय-अप केले आहे. 
- तेजस्विनी सवाई, अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन 

घरपोच पैशाची सुविधा 
एका बॅंकेच्या सहकार्याने सोसायट्यांमधील नागरिकांना घरपोच प्रतिव्यक्ती पाच हजार रुपयांची रक्कम देण्यात येत आहे. त्यासाठी बॅंकेने एकाची नेमणूक केली. खाते क्रमांक आणि अन्य बाबींची खातरजमा केल्यानंतर पैसे दिले जातात. कोणत्याही बॅंकेत असले तरी नाममात्र दरात सुविधा दिली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT