groceries 
पुणे

Lockdown : पिंपरीत खाद्यतेल, शेंगदाणे महागले; किरकोळ विक्रेत्यांकडे मालच नाही!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक किरकोळ दुकानांमध्ये खाद्यतेल, मूगडाळ, मसूरडाळ, शेंगदाणे, रवा, मसाले आदींची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे, विशेषतः खाद्यतेल, शेंगदाणे याच्या किंमती वाढल्या आहेत. 

शहरात मध्य प्रदेश, गुजरात येथून गहू तर आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून तांदुळाची मुख्यत्वे आवक होते. त्याचप्रमाणे, जालना, कुरकुंभ येथून खाद्यतेल विक्रीसाठी आणले जाते. सध्या त्यांच्या आवकीवर परिणाम झाला आहे. 

आळंदी रोड येथील किराणा मालाचे किरकोळ विक्रेते बाळूशेठ कटारिया म्हणाले, "सध्या मूगडाळ, शेंगदाणे, रवा, मसाले, मसूर डाळ यांचा थोडाफार तुटवडा निर्माण झाला आहे. शेंगदाणे यांची किंमत वाढून ११० रुपयांहून १४० रूपये प्रतिकिलो या भावाने विक्री केली जात आहे. खाद्य तेलाच्या १५ लिटर्सच्या डब्यामागे साधारणत : ५० रूपये वाढले आहेत.

परराज्यातील गव्हाची आवक कमी झाली आहे. मात्र, तांदळाची आवक बरीचशी सुरळीत चालू आहे. मात्र, रवा, मसाले, बिस्किटे मिळणे अवघड झाले आहे. घाऊक व्यापारी यांच्याकडे बराचसा माल शिल्लक नाही.परंतु, राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बहुतेक लोकांनी किराणा मालाची जादा खरेदी केली आहे. त्यामुळे, बाजारात पूर्वी इतकी गर्दी राहिली नाही."

पिंपरी चिंचवड किराणा माल घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्याम मेघराजानी म्हणाले, "मध्यप्रदेशमधील गहू आणि आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील तांदळाची आवक कमी झाली आहे. खाद्यतेल कंपन्यांकडे पॅकिंगसाठी कामगार कमी पडत आहेत. त्याचा परिणाम तेलाच्या आवकेवर झाला आहे. मात्र, डाळींची आवक व्यवस्थित होत आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत परिस्थिती बदलेल."

"बाहेरील राज्यामधून येत असलेल्या किराणा मालाच्या आवकीवर थोडा फार परिणाम झाला आहे. पूर्वी ८ ते ९ गाड्या माल येत होता.आता ५ ते ६ गाड्यांची आवक झाली आहे. घाऊक बाजारात किराणा मालाचे भाव जवळपास स्थिर आहेत."
- राजू शिंदे, प्रमुख, पिंपरी उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT