पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात कामगिरी दाखविताना पुणे महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली बनवाबनवी उघडकीस आली आहे. पालिकेच्या कामाची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाला दाखविण्यापुरते ओल्या सुक्या कचऱ्याचे बकेट लावायचे अन पथक गेले की ते काढून टाकून दुसऱ्या ठिकाणी लावल्याचा प्रकार सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत समोर आला आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्याचे टाळले. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’मध्ये २०२० मध्ये पुणे शहराला देशात १५वे मानांकन मिळाले आहे. आगामी वर्षात आणखी सुधारणा व्हावी यासाठी कचऱ्याचा समस्येसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुसरीकडे दिखाऊ कार्यवाही करून फसवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून आलेल्या पथकाने रविवारी (ता.२१) रात्री नांदेड सिटीच्या गेट समोरील हॉटेल रिलॅक्सच्या समोर ओल्या-सुक्या कचऱ्याची पाहणी केली, फोटो काढले. पथक तेथून जाताच अवघ्या काही मिनिटात हॉटेल समोरील बकेट काढून टाकण्यात आले. अशाच प्रकारे या पथकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या परिसरात पाहणी केली केल्यानंतर बकेट काढले. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत पथकातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले.
सर्दी, तापाचे रुग्ण वाढले; घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या!
‘सकाळ’नेही या हॉटेल रिलॅक्स व पोलिस ठाण्याच्या परिसरातील दोन ठिकाणी पाहणी केली असता तेथे बकेट नसल्याचे समोर आले. याबाबत क्षेत्रीय अधिकारी जयश्री काटकर यांच्याशी संपर्क साधला असता'‘दिल्लीतील पथकाने पाहणी केली असल्याचे मान्य केले पण बकेट का काढले यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन उद्या माहिती दिली जाईल असे सांगितले.
‘‘दिल्लीवरून आलेल्या पथकाला दाखविण्या पुरते हॉटेल रिलॅक्स, सिंहगड रस्ता पोलिस ठाणे येथे कचऱ्याचे बकेट लावण्यात आले. पथक गेल्यानंतर बकेट काढून टाकले. हा प्रकार पथकातील अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनीही खातरजमा करण्यास नकार दिला. हे सर्वेक्षणच मॅनेज असल्याचा संशय आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.’’
- महेश पोकळे, विभागप्रमुख, शिवसेना
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘‘महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात नागरिक सहभागी होत आहेत, पण प्रशासनातर्फे नागरिकांची फसवणूक केली जात असून, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.’’
-अभिजित बारवकर, नागरिक
‘‘दिल्लीवरून आलेले पथक संपूर्ण शहरात पाहणी करणार आहे, या सर्वेक्षणासाठी महापालिकेने प्रामाणिकपणे काम केले आहे. पण सिंहगड रस्ता भागात असा प्रकार घडला असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल.’’
- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.