वैष्णवी sakal
पुणे

रिक्षाचालकाच्या मुलीचे आयआयटीचे स्वप्न साकार!

एलन करिअर इन्स्टिट्यूटतर्फे परीक्षेच्या तयारीसाठी शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिक्षाचालक बबन मारुती पांडुळे यांची मुलगी वैष्णवी हीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून अव्वलस्थान पटकावले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) शिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

‘एलन’च्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वैष्णवीला भविष्यात जेईई ॲडव्हान्सची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन, आयआयटीमध्ये संगणक विज्ञान शाखेत बी.टेक.चे शिक्षण घ्यायचे आहे. सुरेंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून वैष्णवीचा संपर्क एलनच्या पुणे केंद्राशी झाला. त्यानंतर तिला ९० टक्केपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय ‘एलन’तर्फे घेण्यात आल्याची माहिती केंद्र प्रमुख अरुण जैन यांनी सांगितली.

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण

कोरोनामुळे ज्या कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावली असेल, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ‘एलन’ने पुढाकार घेतला आहे. एलन करिअर इन्स्टिट्यूटद्वारे त्यांचे शिक्षण मोफत करण्यात आले आहे. अशा १४० विद्यार्थ्यांना एलनमध्ये प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती संचालक नविन माहेश्वरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टात काय घडलं? न्यायाधीशांनीच दिला कोर्टासमोर आंदोलन करण्याचा इशारा, प्रशासनावर तीव्र नाराजी

एक्सप्रेस वेवर मृत्यूचं तांडव! भाविकांच्या ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकारकडून पेन्शनमध्ये बदल; 3.20 कोटी लोकांना फायदा, नेमकं काय बदललं?

Latest Marathi News Live Update : नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा, तर भगवानगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार

SCROLL FOR NEXT